September 21, 2024

औरंगाबाद जिल्ह्यातून एकाच दिवसांत 10 जण बेपत्ता, वेगवेगळ्या पोलीस ठाण्यात नोंद

0
Contact News Publisher

औरंगाबाद जिल्ह्यातून एकाच दिवसांत 10 जण बेपत्ता, वेगवेगळ्या पोलीस ठाण्यात नोंदऔरंगाबाद ग्रामीण पोलिसांच्या वेगवेगळ्या पोलीस ठाण्यात करण्यात आलेल्या नोंदीनुसार जिल्ह्यातून बुधवारी एकाचवेळी 10 जण बेपत्ता झाली आहे. ज्यात दोन लहान मुलांचा देखील समावेश आहे. या घटनेने जिल्ह्यात खळबळ उडाली असून, बेपत्ता झालेल्या व्यक्तींचा शोध घेण्याचे पोलिसांसमोर आवाहन असणार आहे.

औरंगाबाद ग्रामीण पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 21 डिसेंबरला ग्रामीण भागातील वेगवेगळ्या घटनेत एकूण 10 जण बेपत्ता झाले असल्याची नोंद करण्यात आली आहे. ज्यात बिडकीन पोलीस ठाणे ह्द्द्तील3 जण, चिकलठाणा पोलीस ठाणे हद्दीत 1 जण, सिल्लोड शहर पोलीस ठाणे हद्दीत एका महिलेसोबत तिचे 2 मुलं असे 3 जण, सिल्लोड ग्रामीण पोलीस ठाणे हद्दीत 1 जण, कन्नड शहर पोलीस ठाण्यात 1 जण आणि फुलंब्री पोलीस ठाण्यात 1 जण असे 10 जण बेपत्ता असल्याची नोंद पोलिसात करण्यात आली आहे.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Trending