September 21, 2024

औरंगाबाद शहरात रोड रोमिओंच्या उच्छादाने नागरिक त्रस्त; पोलिसांची भीतीच उरली की नाही!

0
Contact News Publisher

औरंगाबाद शहरात गेल्या काही दिवसांपासून घडत असलेल्या घटना पाहता शहरात पोलिसांचा धाक उरलाच नसल्याचा आरोप होऊ लागला आहे. आता अशातच रोड रोमिओंच्या राड्याचा एक व्हिडिओ समोर आला आहे. ज्यात हे तरुण हातात दगड घेऊन परिसरात राडा घालतांना पाहायला मिळत आहे. नागरिकांनी हा सर्व प्रकार आपल्या मोबाईलमध्ये कैद केला असून, कारवाईची मागणी देखील केली आहे.

 

औरंगाबादच्या वाळूज महानगर परिसरातील बजाजनगरमध्ये खाजगी कोचिंग क्लासेस करून घरी परतणाऱ्या विद्यार्थ्यांचे रस्त्यावर राजरोसपणे वादविवाद होत असल्याने परिसरात नागरिक त्रस्त झाले आहेत. या घटनांमुळे बजाजनगर परिसरातील नागरिकांना मोठा नाहक त्रास सहन करावा लागत आहे. रात्रीच्या वेळेस कोचिंग क्लासेस सुटल्यानंतर हे रोड रोडरोमिओ रस्त्यावर धूम स्टाईलने वावरत असल्याने कोचिंग क्लासेस करून घरी परतणाऱ्या मुलींच्या सुरक्षेचा प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. त्यामुळे या परिसरातील रोडवर पोलीस प्रशासनाने रात्रीची गस्त वाढवावी अशी मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे.

 

 

याबाबत प्रतिक्रिया देतांना स्थानिक महिला म्हणाल्या की, या परिसरात अनेक रोडरोमिओ रात्रीच्या वेळेस फिरत असतात. त्यांच्यात जोरात वाद होत असतात. जोरजोरात शिवीगाळ करतांना त्यांच्या हातात मोठ-मोठे दगड असतात. तसेच त्यांच्यात हाणामारी देखील होतांना पाहायला मिळते. आमचा रहिवासी परिसर असून, देखील अशाप्रकारे रोड रोमिओंच्या उच्छाद नेहमी पाहायला मिळत असतो. अनेकदा आमची लहान मुलं रस्त्यावर , त्यामुळे त्यांच्या वादात मुलांना धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे पोलिसांनी या परिसरात गस्त वाढवावी अशी मागणी परिसरातील महिलांनी केली आहे.

 

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Trending