September 21, 2024

औरंगाबाद: राज्यातील पहिले महिला कृषी महाविद्यालयात औरंगाबादेत होणार

0
Contact News Publisher

राज्यातील पहिले महिला कृषी महाविद्यालय औरंगाबाद सुरू केले जाणार असल्याची घोषणा राज्याचे कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी मंगळवारी विधान परिषदेत केली आहे. औरंगाबादेत महिला कृषी महाविद्यालय सुरू करावे यासाठी मराठवाडा पदवीधर मतदारसंघाचे आमदार सतीश चव्हाण यांनी अधिवेशनात प्रश्न उपस्थित करून सभागृहाचे लक्ष वेधले होते. त्यांच्या प्रश्नाला उत्तर देतांना सत्तार यांनी ही घोषणा केली आहे.

औरंगाबाद येथे महिला कृषी महाविद्यालय स्थापन करण्याबाबत सतीश चव्हाण यांनी सभागृहाच्या निदर्शनास आणून दिले. महिला कृषी महाविद्यालय स्थापन करण्यासाठी वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाने सादर केलेल्या प्रस्तावास कृषी शिक्षण व संशोधन परिषदेच्या 2 सप्टेंबर 2022 रोजी झालेल्या बैठकीत मान्यता मिळाली असल्याचे देखील सतीश चव्हाण यांनी सभागृहाच्या निदर्शनास आणून दिले. त्यामुळे अखेर औरंगाबादमध्ये राज्यातील पहिले महिला कृषी महाविद्यालय सुरु करण्याची घोषणा कृषीमंत्री सत्तार यांनी केली.

मराठवाड्याला फायदा होणार…

औरंगाबाद शहर मराठवाड्यातील शिक्षणाचा हब बनला आहे. कारण औरंगाबाद जिल्ह्यातील ग्रामीण भागासह मराठवाड्यातील इतर जिल्ह्यातील मुली देखील शिक्षणासाठी औरंगाबाद शहरात येतात. यात अनेक मुली शेतकरी कुटुंबातून येतात. त्यामुळे शेतकऱ्यांच्या मुलींना कृषी क्षेत्रात प्रगती करण्यासाठी या नवीन कृषी महाविद्यालयाचा मोठा फायदा होणार आहे. त्यामुळे कृषीमंत्री यांच्या या निर्णयाचा औरंगाबादसह मराठवाड्याला होणार आहे.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Trending