बाजार सावंगी येथे पत्रकारांचा सन्मान
सुलतानपुर-अतुल वेताळ
सुलतानपूर, खुलताबाद तालुक्यातील बाजार सावंगी येथे ग्रामपंचायत कार्यालयात दर्पणदिन तथा पत्रकार दीन मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला. कार्यक्रमांच्या अध्यक्षस्थानी सरपंच आप्पाराव पाटील नलावडे होते. प्रथमता बाळशास्त्री जांभेकर तथा वृतपत्रकार,संपादक, प्राध्यापक आद्य आचार्य मराठी वृत्तपत्र सृष्टीचे जनक यांना जयंती निमित्त विनम्र अभिवादन करण्यात आले. जेष्ठ ग्रामपंचायत सदस्य पोपट शाहुबा काटकर यांनी आयोजित केलेल्या दर्पण दिनानिमित्त बाजार सावंगी व परिसर तथा सर्कलमधील सर्व पत्रकार यांचे पुष्पगुच्छ तथा शाल देवुन ( सत्कार) करण्यात आला. यावेळी ज्येष्ठ पत्रकार श्रीधर पाटील ,माजी सरपंच भिमराव नलावडे, सरपंच आप्पाराव नलावडे, जेष्ठ समाजसेवक पुंजाजी अण्णा नलावडे,पोपट काटकर यांनी आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी ग्रामपंचायत सदस्य अरुण गायकवाड, कल्याण काटकर, गायकवाड, ग्रामविकास अधिकारी ए.बी बनसोड
चांद खान पठाण, सय्यदलाल , सचिन गवळी, रामेश्वर नलावडे,मुनीर शहा, विनोद नलावडे,जीवन राजपुत ,हरिदास सराटे,शेख हबीब,अतुल वेताळ, ज्ञानेश्वर हर्दे आदिची उपस्थिती होती.