बाजार सावंगी येथील ग्रुप ग्रामपंचायतीच्या वतीने परिसरातील पत्रकारांचा सत्कार करण्यात आला
बाजार सावंगी प्रतिनिधी- रामेश्वर नलावडे
बाजार सावंगी-(ता.06) खुलताबाद तालुक्यातील बाजार सावंगी येथील ग्रामपंचायतच्या वतीने (दि.06) शुक्रवार रोजी पत्रकार दिनाच्या निमित्ताने तालुक्यातील ग्रामीण पत्रकारांचा सत्कार समारंभ करण्यात आला
अध्यक्षस्थानी सरपंच आप्पाराव नलावडे माजी सरपंच वसंतराव नलावडे तंटामुक्तीचे माजी अध्यक्ष पुंजाजी नलावडे सदस्य पोपट काटकर अरुण गायकवाड कल्याण काटकर बबन पुंड ग्राम विकास अधिकारी ए बी बनसोड यांची उपस्थिती होती
आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीनिमित्त दर्पण दिन पत्रकार गौरव दिन साजरा केला जातो
सरपंच व मान्यवरांनी सर्वच पत्रकारांचा शाल पुष्पगुच्छ देऊन गौरव केला व ग्रामीण भागातील रास्त समस्यांसह सामाजिक राजकीय वय शैक्षणिक समाज प्रबोधनाचे आपल्या लेखणीतून कार्य करावे असे आवाहन केले
ज्येष्ठ बातमीदार श्रीधर पाटील सह सय्यद लाल,चांदखा पठाण,रामेश्वर नलावडे,विनोद नलावडे,नामदेव नलावडे, सचिन गवळी,मुनीर शहा,शेख हबीब,ज्ञानेश्वर हारदे,
जीवन राजपूत,हरिदास सराटे सह चॅनल प्रतिनिधीची उपस्थिती होती