बालिका दिन : जि.प. शाळा गोळवाडी येथे बालआनंदनगरी साजरा
- प्रतिनिधी: अकील काजी(वैजापूर)
सुंदर सजले मैदान असे की, समारंभ ही सुंदर दिसे.
रोज आढळणारा परिसर ही आज नवखा दिसत असे.
कुठे खमंग खाऊ, तर कुठे चाऊमाऊ. आनंदाचे डोही ,आनंद तरंग ऐकून गीत हे मनाला उमंग येत असे.
जत्रा आहे की यात्रा रूप त्याच नवखे दिसे. संसाराच्या रणगाडयातून कधीतरी तिलाही मनोमन वाटते की,कुठे तरी जावे, खूssप खरेदी करावी, पदार्थांची लज्जत दिर्घ काळ जिभेवर रेंगाळावी , मैत्रिणींशी निवांत गप्पा माराव्यात , हितगुज सांगावे , सुख दुःखे झेलावीत अन् एक दिर्घ उसासा टाकून स्वतःला मजबूर न करता मजबूत करण्यासाठी यावं … सखींच्या मेळाव्यात … द्यावं दिलखुलास स्वतःला झोकून …. अन् …खुssशाल खेळावी झिम्मा फुगडी. असच् काहीसं मनात खदखदलं अन् मग काय बालआनंद नगरी ,अन माता पालक मेळावा धाग्यांची भावगुंफन करत प्रत्यक्ष महिलांसाठी व शौकीन खवय्यांसाठी आज *जि.प.उच्च प्रा . शा .गोळवाडी* येथे मुक्त दालनच् खुलं करण्यात आलं .
नफा तोटा, हार जीत , चढ़ उतार हे पुस्तकातील शब्द जेव्हा प्रत्यक्ष व्यवहारात अनुभवता येतात तेव्हाच खऱ्या अर्थानं बालकाचं शिकणं सुरू होतं … *वाचलेलं आणि वेचललं जेव्हा एकत्र येतं ना तेव्हा जगणं सुकर होतं* चिमुकल्यांना आई बाबांच्या कष्टाची जाण ,चिकाटी याबरोबरच अन्नाचा वापर आणि स्वकमाईचा खरा आनंद द्विगुणीत करण्यासाठी विविध पदार्थांच्या स्टॉलद्वारे बालआनंद नगरीचे आयोजन आज दि .07:01:2023 रोजी गोळवाडी शाळेत करण्यात आले .
सुंदर अशा मंगलमय बालगीताने सुरुवात, मुलांनी लावलेले विविध स्टॉल त्याचा आनंद घेणारी प्रचंड गर्दी ,वरिष्ठ,पालक,तरुण ,बालके व महिला भगिनींच्या उपस्थितीने फुलून गेलेलं प्रांगण,लहान बालकांचा किलबिलाट,सनई वादनाची मंजुळ ध्वनी, जिकडे-तिकडे खरेदी-विक्रीचा आनंद अशा विविधतेने आनंद नगरी जणू आनंदाने प्रफुल्लित झालेली वाटली.
या बहुरंगी कार्यक्रमाला श्री.सांबरेसर मु. अ. करंजगाव तसेच दहेगाव येथील D.P. कृषीमहाविद्यालयातील प्रा.व NSS चे विद्यार्थी यांची उपस्थिती व खरेदी मुलांना प्रोत्साहन देऊन गेली.केंद्रातील सर्व शिक्षकांच्या शुभेच्छांनी कार्यक्रम अपेक्षेपेक्षा जास्त प्रभावी झाला.
सर्व गावातील मान्यवरांची साथ,नागरिकांचा सक्रिय सहभाग,महिलांची प्रचंड मेहनत व उपस्थिती,युवकांचे सहकार्य व सर्व गावाची साथ,प्रशासनाची प्रेरणा व शिक्षक मित्राकडून मिळणारी प्रचंड ऊर्जा यामुळेच कार्यक्रमास भरभरून प्रतिसाद मिळाला.
*या कार्यक्रमाचे आयोजक :-जि.प.उच्च प्रा.शाळा गोळवाडी*
केंद्र पालखेड ता.वैजापुर.
श्रीमती डिके मॅडम मु.अ.
श्री आळंजकर सर
श्री खरातसर
श्रीम.पोतदार मॅडम
श्रीम. काळे मॅडम
श्रीम.आहेर मॅडम
शब्दांकन
श्रीम डिके एस. एल.मु.अ.गोळवाडी
फलक लेखन -श्रीम काळे मॅडम यांनी केले.
यावेळी उपस्थित गावातील
सरपंच,उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य, पत्रकार अकील काजी,बाबासाहेब वाघ,गहिनीनाथ वाघ स्वराज मांजरे, महिला मंडळी, जेष्ठ नागरिक,गावातील किलबिल मुले.. सर्वांनी या बालगोपालं आनंद नगरी मध्ये सहभाग नोंदवीला.