September 22, 2024

खिर्डीचे सरपंच ज्ञानेश्वर मातकर यांचे पद रद्द; विभागीय आयुक्तांचे आदेश

0
Contact News Publisher

खुलताबाद,खिर्डी : ज्ञानेश्वर मातकर हे सदर ग्रामपंचायत मध्ये सदस्य पद सन 2021 ते 2025 या कालावधीसाठी तर ग्रामपंचायत निवडणूक झालेली होती त्यामध्ये ज्ञानेश्वर मातकर हे ग्रामपंचायत सदस्य म्हणून निवडून आले व बहुमताने सदर ग्रामपंचायत मध्ये सरपंच म्हणून पदभार स्वीकारले होते त्यानंतर सदर सरपंच पदावर निवड झाल्या नंतर त्यांनी सरपंच पदाच्या कर्तव्यात कसूर व बेकायदेशीर कामे केल्यामुळे त्यांच्या विरोधात सुनील घुसळे यांनी विभागीय आयुक्त औरंगाबाद यांच्या न्यायालयात महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम 1958 चे कलम 39 (1) नुसार कामात अनियमित्ता केल्यामुळे व पदाचा दुरुपयोग केल्यामुळे सरपंच पद व सदस्य पद रद्द करावे म्हणून वकील शरद वि भागडे पाटील यांच्यातर्फे प्रकरण दाखल केले होते.

त्यामध्ये त्यांनी ग्रामपंचायत मध्ये 15 वित्त आयोगाचा निधी हा ग्रामसभा ची मंजुरी न घेता परस्पर खर्च करणे परस्पर वारस प्रमाणपत्र देणे ग्रामविकास निधी हा बँकेत न भरणे सरपंच पदाला शोभेल असे काम न करणे तसेच मनमानी कारभार करणे ग्रामपंचायत मध्ये असलेले प्रमाणक 18 19 20 21 22 हे व्यवस्थित न ठेवणे व ग्रामपंचायत मध्ये कामामध्ये भ्रष्टाचार करणे असे अनेक मुद्दे त्यांच्या विरोधात दोषारोपपत्र म्हणून ठेवण्यात आले होते त्यामध्ये माननीय विभागीय आयुक्त औरंगाबाद यांनी संबंधित मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद व गटविकास अधिकारी खुलताबाद यांचा सविस्तर असा चौकशी अहवाल मागून घेण्यात आला त्यानंतर अपीलदार वगैरे अर्जदार यांना सुनावणीची समान संधी देण्यात आली सुनावणी नंतर तक्रारदार यांनी हे सिद्ध केले की सरपंच ज्ञानेश्वर मातकर यांनी सरपंच पदावर विराजमान झाल्यानंतर महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम 1958 चे कलम 39 (1) नुसार कामात पारदर्शकता न ठेवता कामकाज केले व कर्तव्यात कसूर केला त्यामुळे त्यांच्या विरोधात ठेवण्यात आलेले दोषारोपपत्र हे सुनावणी वेळी तक्रारदार यांची वकील शरद भागडे पाटील यांनी सुनावणीमध्ये सिद्ध केले की ज्ञानेश्वर मातकर यांनी सरपंच पदाचा दुरुपयोग केला व कामात कसूर केला त्यामुळे ग्रामपंचायत सदस्य पदावरून पाया उतार होण्याची वेळ आली व त्यामुळे त्यांचे सदस्य पद व ग्रामपंचायत सरपंच पद हे तात्काळ विभाग आयुक्त यांच्या आदेशानुसार रद्द करण्यात आले.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Trending