September 22, 2024

आमदार प्रशांत बंब याच्या हस्ते खुलताबाद तालुक्यातील 254 घरकुल लाभार्थ्यांना प्रथम हप्ता वाटप -एकूण रक्कम 3810000

0
Contact News Publisher
  • रमाई आवास घरकुल योजना सन 2021-22

अंतर्गत एकूण 254 घरकुले पंचायत समिती खुलताबाद कार्यालयाने मंजूर केले आहे प्रती घरकुलास 120000/- व नरेगा योजनेतून प्रति घरकुल 23000/-असे एकूण अनुदान 143000रु देण्यात येतात पंचायत समिती खुलताबाद कार्यालयाकडून रमाई आवास योजनेतुन 36322000 रक्कम वितरण करण्यात आली आहे खुलताबाद तालुक्यातील 254 लाभार्थ्यांच्या बँक खाते मध्ये प्रथम हप्ता 15000 /रु प्रमाणे आमदार प्रशांत बंब याच्या हस्ते प्रथम हप्ता 15000 /रु प्रमाणे एकूण 3810000/- एवढे रक्कम fto व्दारे क्लीक करून आमदार प्रशांत बंब , भंतोजी एस.प्रज्ञाबोधी ,सागर बोधी , किशोर आबा धनायत, हर्षवर्धन कराड, गटविकस अधिकारी प्रवीण सुरडकर यांच्या हस्ते वितरित करण्यात आले. गटविकास अधिकारी प्रवीण सुरडकर यांनी याबाबत सविस्तर माहिती दिली या कार्यक्रमास पंचायत समिती सभापती गणेश नाना अधाने, भाजपा तालुकाध्यक्ष प्रकाश वाकळे, माजी उपसभापती दिनेश अंभोरे, सरपंच आतिश देवगिरीकर, युवा मोर्चा तालुकाध्यक्ष राहुल निकुंभ,आर पी आय तालुकाध्यक्ष फकिरराव भालेराव, नगरसेवक योगेश बारगळ,संदिप निकम, अविनाश वेताळ, रावसाहेब देशमुख, आमोल गवळी, प्रभाकर घाटे तसेच धम्म परिषदेसाठी आलेले नागरिक मोठ्या संख्येत उपस्थित होते पंचायत समिती घरकुल कक्षातील प्रकाश वाकळे, योगेश गवळी,विजय वरशील हेही हजर होते.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Trending