December 4, 2024

किसान मोर्चात नवा ट्विस्ट : बैठकीसाठी सरकारनेच आमच्याकडे यावं; नेत्यांची आक्रमक भूमिका!

0
Contact News Publisher

शेतकरी, कष्टकरी आदिवासी बांधव यांनी विविध मागण्यांसाठी दिंडोरी येथून पायी लाँमार्च काढला आहे. जोपतर्यंत मागण्यांसंदर्भात निर्णय होत नाही तोपर्यंत मागे हटणार नाही, असा निर्धार किसान मोर्चात सामील झालेल्या शेतकऱ्यांनी केला आहे.

किसान सभेच्या मोर्चात आता वेगळा ट्वि्स्ट आला आहे. किसान मोर्चा शिष्टमंडळ मुंबईत रवाना होणार नाही तर मुख्यमंत्री आणि सरकारमधील मंत्र्यांनी आमच्याकडे यावे, अशी ठाम भूमिका मोर्चाने घेतली आहे. मोर्चाचे नेते जे पी गावीत यांनी म्हंटले आहे की, “सरकार सन्मानाने वागणूक देत नाही, आम्ही आता चर्चेसाठी जाणार नाही, सामान्य माणूस ही सरकारला झुकवू शकतो, हे आम्ही दाखवून देणार आहोत, असे गावीत म्हणाले आहेत.

 

शेतकरी मोर्चा लालभडक वादळ आता नाशिक तालुक्याची सीमा ओलांडून मुंबईकडे कूच करत आहे. नाशिकमधील दिंडोरी तालुक्यातून हा मोर्चा रवाना झाला होता. आता हा मोर्चा इगतपुरीत येऊन धडकला.
किसान मोर्चा शिष्टमंडळ आणि सरकारचे प्रतिनिधी यांची बैठक पार पडणार होती. मात्र मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांसोबत होणारी बैठक काल सरकारनकडून रद्द करण्यात आली. तर आज आंदोलकांनीच या बैठकीत सामील होण्यास नकार दर्शवला.

मोर्चा मुंबईत जाणार आहेच, मात्र आता चर्चेसाठी मंत्र्यांनीच आमच्याकडे यावे, असे गावित यांनी भूमिका घेतली आहे. संप करणाऱ्या सरकारी कर्मचाऱ्यांना सरकारने तातडीने प्राधान्य दिले, मात्र शेतकऱ्यांच्या वेदना सरकारला कळत नाही, शेतकऱ्यांच्या पाहायला सरकारला वेळ नाही, म्हणत आंदोलकांनी संताप व्यक्त केला आहे.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Trending