September 21, 2024

कृषीमंत्री अब्दुल सत्तार शेतकऱ्यांच्या बांधावर, अवकाळीच्या नुकसानीची केली पाहणी

0
Contact News Publisher

मराठवाड्यातील अनेक भागात गेल्या दोन दिवसांपासून अवकाळी पाऊस पडतोय. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. दरम्यान कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी आज नुकसानग्रस्त भागाची पाहणी करून, परिस्थितीची माहिती जाणून घेतली. तसेच अधिकाऱ्यांना सूचना केल्या. सत्तार यांनी जालना जिल्ह्यातील वडीगोद्री येथे बेमोसमी अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीची शेताच्या बांधावर जाऊन पाहणी केली. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधून त्यांना धीर दिला. तसेच झालेल्या नुकसानीचे वस्तुनिष्ठ पंचनामे करून तातडीने प्रस्ताव सादर करावे असे निर्देश सत्तार यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Trending