September 21, 2024

नुकसानग्रस्त शेतांची कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी केली पाहणी

0
Contact News Publisher

तातडीने वस्तुनिष्ठ पंचनामे करण्याचे दिले निर्देश

दि.19, अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे राज्यात अनेक ठिकाणी शेतपिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. नुकसानग्रस्त भागात कृषी मंत्री अब्दुल सत्तार शेताच्या बांधावर जाऊन पाहणी करत असून शेतकऱ्यांना धीर देत आहेत.

शेत शिवारातील रस्त्यासाठी 9 लाख रुपये महाराष्ट्रातील प्रत्येक तालुक्याची व गावांची यादी आली

आज कन्नड तालुक्यातील पिशोर, पळशी बुद्रुक , साखरवेल शिवारात कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांनी अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीची शेताच्या बांधावर जाऊन पाहणी केली. यावेळी शेतकऱ्यांशी संवाद साधून त्यांना मंत्री अब्दुल सत्तार यांनी धीर दिला.

झालेल्या नुकसानीचे वस्तुनिष्ठ पंचनामे करून तातडीने प्रस्ताव सादर करावे तसेच पंचनामा पासून एकही नुकसानग्रस्त शेतकरी वंचित राहणार नाही याची गांभीर्याने दक्षता घ्यावी असे निर्देश कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले.

online application 2022 : मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना महाराष्ट्र माहिती

राज्यातील सरकार हे शेतकऱ्यांचे सरकार असून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी हताश न होता धीर धरावा, अधिकाऱ्यांना नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. राज्य सरकार नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या पाठिशी खंबीरपणे उभे आहे. झालेल्या नुकसानीबाबत मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस लवकरच निर्णय घेतील असे कृषिमंत्री अब्दुल सत्तार म्हणाले.

यावेळी जिल्हा बँकेचे अध्यक्ष नितीन पाटील, उपाध्यक्ष अर्जुन पा. गाढे, संचालक डॉ. मनोज राठोड, राजेंद्र ठोंबरे, पुंडलिक काजे, उपविभागीय कृषी अधिकारी ज्ञानेश्वर बरदे, तालुका कृषी अधिकारी बाळराजे मुळीक, नायब तहसीलदार श्री. राजपूत, मंडळ कृषी अधिकारी सरकलवार , कृषी सहाय्यक जगदीश पवार, एकनाथ वाघ आदी अधिकाऱ्यांसह परिसरातील शेतकऱ्यांची उपस्थिती होती.

Download list : पंतप्रधान आवास घरकुल योजना; जिल्हा, तालुका, गावं निवडा आणि गावांतील यादी पहा : 2022

 

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Trending