“वेरूळ परिसराला अवकाळी ने झोडपले, शेतकऱ्यांचे नुकसान”

“सरसकट पंचनामे करून त्वरील एकरी ५०००० हजार रुपये नुकसान भरपाई द्यावी – सतीश लोखंडे”
दिनांक 16 17 आणि 18 च्या मध्यरात्री झालेल्या वेरूळ परिसरासह संपूर्ण तालुक्याला अवकाळी पावसाने अक्षरशः झोडपले असून यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. गहू, मक्का, बाजरी, हरभरा, ज्वारी सारखी पिके आडवी झाली आहेत. ढगाळ वातावरण आणि पावसामुळे जर असेच चालू राहिले तर भरलेल्या दाण्यांमध्ये कोंब येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. यामुळे शेतकरी मोठ्या संकटात सापडला असून शासनाने त्वरित पंचनामे करून प्रति एकरी 50 हजार रुपये नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी शेतकरी वर्गाकडून होत आहे.
(“शासनाने त्वरित सरसकट पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी”
एकीकडे शेतमालाला हमीभाव नाही, वाढती महागाई खते- औषधी यांचे भाव, गगनाला भिडले आहेत. फवारणी, मशागतीचा खर्च आणि मजुरांचा खर्च शेतकऱ्यांना परवडेनासे झाला आहे. शेतीवरील खर्चात झालेली भरमसाठ वाढ आणि त्या प्रमाणात शेतकऱ्यांना हमीभाव नाही. त्यातच या नैसर्गिक संकटामुळे तालुक्यातील शेतकरी मोठा हवालदिल झाला आहे. शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे तरी शासनाने त्वरित सरसकट पंचनामे करून एकरी 50 हजार रुपये अनुदान द्यावे अशी मागणी सतीश लोखंडे यांनी केली आहे.
सतीश देवेंद्र लोखंडे,आम आदमी पार्टी जिल्हा उपाध्यक्ष युवक आघाडी छ. संभाजीनगर)