खुलताबाद येथे ग्रामसुरक्षा यंत्रणे विषयक प्रशिक्षण शिबिर संपन्न; ग्राम सुरक्षा यंत्रणा टोलफ्री दुरध्वनी क्रमांक

मालमत्ते संदर्भात व शरीराविरुध्द होणाऱ्या विविध गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी पोलीस अधीक्षक औरंगाबाद ग्रामीण व मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद औरंगाबाद यांच्या संयुक्त विद्यमाने गावागावात ग्राम सुरक्षा यंत्रणा टोलफ्री दुरध्वनी क्रमांक १८००२७०३६०० कार्यान्वित करण्याचे काम सुरू असून त्या अनुषंगाने जास्तीतजास्त नागरिकांमध्ये या यंत्रणे विषयी जनजागृती व्हावी या साठी खुलताबाद पोलीस ठाण्याच्या वतीने ग्राम सुरक्षा यंत्रणा विषयक विशेष प्रशिक्षण शिबिर घेण्यात आले. शिबिरात यंत्रणेचे संचालक डी. के. गोराडे यांनी प्रात्यक्षिकासह नागरिकांना सखोल असे मार्गदर्शन केले.
खुलताबाद पंचायत समिती एकात्मीक बाल विकास सेवा योजना शिलाई मशीन व सायकल योजना लाभार्थ्यांची यादी
सोमवार दि. ३ रोजी खुलताबाद पोलीस ठाण्याच्या वतीने शहरातील यशोदा लॉन्स येथे या शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी पोलीस निरीक्षक भुजंग हातमोडे तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून यंत्रणेचे जनक संचालक डी.के. गोराडे यांची उपस्थिती होती.
गाय म्हैस अनुदान योजना : गाय 70 म्हशीसाठी 80 हजार अनुदान -येथे करा ऑनलाईन अर्ज
या वेळी मार्गदर्शन करताना संचालक डी.के. गोराडे म्हणाले की, नागरिकांनी आपला मोबाईल नंबर या यंत्रणेत नोंदवल्या नंतर ही अपात्कालीन ग्राम सुरक्षा संपर्क यंत्रणा कार्यान्वित होते, आपल्या फोन वरून टोलफ्री दुरध्वनी क्रमांक १८००२७०३६०० हा डायल केल्यानंतर ही यंत्रणा अपात्कालीन मदतीचे काम करते.
खुलताबाद-कागजीपुरा येथे बालविवाह रोखला; पोलीस प्रशासन घटनास्थळी..
ही संपूर्ण यंत्रणा संपूर्ण स्वयंचलित आहे,
सर्व गावांसाठी ही यंत्रणा सुरू करणे व सहभागी होण्यासाठी अतिशय सोपी पध्दत आहे. दुर्घनेचे स्वरूप, तीव्रता, ठिकाण कळल्याने गावकऱ्यांना विनाविलंब व नियोजनबद्ध मदतकार्य करता येते. या यंत्रणेत नियमानुसार दिलेले संदेशच स्वयंचलितरित्या प्रसारित होतात. नियमबाह्य व अपूर्ण संदेश रद्द होतात. हा संदेश परिसरात १० किलोमीटर पर्यंत तत्काळ जातो. तसेच ही यंत्रणा कशी कार्यान्वित करावी याचे प्रात्यक्षिक ही गोराडे यांनी दाखवले.
सर्व ग्रामपंचायतीच्या १५ व्या वित्त आयोगाच्या निधीतून यासाठीचा खर्च करण्यास ग्रामपंचायतीस शासकीय अनुज्ञेय असल्याचेही त्यांनी सांगितले.
खुलताबाद तालुका कृषी अधिकारी अडकला अँटी करप्शनच्या जाळ्यात!
या ग्राम सुरक्षा यंत्रणेच्या माध्यमातुन चोरी, दरोडा, आग जळीतांच्या घटना, लहान मुले हरवणे, शेतातील पिकाची चोरी, गंभीर अपघात, वन प्राणी हल्ला, पुर, भुंकप आदी घटने मध्ये सर्व गावाला एकाच वेळी सुचना देणे व सावधान करणे किंवा मदतीला बोलवणेसाठी ग्राम सुरक्षा यंत्रणेची उपयोगीता वेळोवेळी सिध्द होत असल्याचे तसेच कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलीस दलात ग्राम सुरक्षा यंत्रणेच्या वापरामुळे मोठी मदत होत असल्याचे ही संचालक गोराडे म्हणाले.
जमिनींचे Record : 1880 पासून चे जुने सातबारा/फेरफार पहा आपल्या मोबाईलवर -Land Record
ते पुढे म्हणाले की, खेड्यापाड्यातून याबाबत जागृती करण्याची गरज आहे. ही यंत्रणा आपापल्या ग्रामपंचायत मार्फत गावागावातून कार्यान्वित करता येते. याबाबत तरूणांनी पुढाकार घेऊन जनजागृती करावी व ॲप डाऊनलोड करून जास्तीत जास्त नागरिकांची नोंदणी करून अपात्कालीन ग्राम सुरक्षा संपर्क यंत्रणा सुरू करावी, असे आवाहन ग्राम सुरक्षा यंत्रणेचे संचालक डी. के. गोरडे यांनी केले.
Aadhaar कार्ड’ला Mobile Link Online आधार ‘कार्ड’ला मोबाईल नंबर 2 मिनिटांत असा लिंक करा
उद्योगासाठी 15 लाख कर्ज मिळणार अर्ज करण्याचे आवाहन
या वेळी पोलीस उपनिरीक्षक जनार्दन मुरमे, पोलीस उपनिरीक्षक विजयकुमार वाघ, पोलीस उपनिरीक्षक संजय बाहुरे, पोलीस पाटील संघटना तालुकाध्यक्ष जनार्दन उबाळे, उपाध्यक्ष सिंधुताई बढे, सचिव रमेश धिवरे, जिल्हा कार्यकारणी सदस्य संतोष सतदिवे, यांच्या सह तालुक्यातील विविध गावचे सरपंच, उपसरपंच, ग्राम पंचायत सदस्य, पोलीस पाटील, तंटामुक्ती अध्यक्ष व तलाठी, कोतवाल, पत्रकार, राशन दुकानदार, ग्रामपंचायत कर्मचारी, आशा सेविका, अंगणवाडी सेविका, डॉक्टर, शिक्षक, सोसायटी चेअरमन सर्व पोलीस कर्मचारी यांच्यासह सामाजीक कार्यकर्ते व प्रतिष्ठित नागरिकांची मोठ्या संख्येने संख्येने उपस्थिती होती.
Pan Card : मधील या दोन चुका पडतील भारी, १० हजाराचा दंड आणि.. शिक्षा..