सावधान!! औरंगाबाद शहरात विना हेल्मेट, ट्रिपल सीट आढळल्यास होणार गुन्हा दाखल

औरंगाबाद शहरात यापुढे विना हेल्मेट, ट्रिपल सीट, विरुद्ध दिशेने वाहन चालवाल तर दाखल होणार दखलपात्र गुन्हा
2000 Note Exchange Guidelines- 24ठीक, पण 25व्या नोटेसाठी पॅन-आधार कार्ड सक्तीचं, जाणून घ्या काय नियम
पोलीस आयुक्तालय, औरंगाबाद शहर अंतर्गत शहर वाहतुक विभागतर्फे दिनांक ०२/०५/२०२३ पासून वाहतूक नियमनां बरोबर चौका-चौकात विशेष मोहिम राबवुन ट्रिपल सीट, विना हेल्मेट व विरुध्द दिशेने वाहन चालविणारे वाहनचालकांवर प्रभावीपणे कारवाई करण्यात येत असून अशा वाहनांवर आज पर्यंत एकूण १०.८८७ केसेसची कारवाई करुन एकुण ८,०५५,०००/- रुपये दंड तडजोड रक्कम आकारण्यात आली आहे. तसेच यापूर्वी करण्यात आलेल्या ई चलान कारवाईचे तडजोड रुपये ३७,२५,७००/- वसुल करण्यात आला आहे. तसेच यापुढेही अशीच मोहिम राबविण्यात येत आहे. तरी सर्व नागरीकांना आवाहन करण्यात येते की, आपण सर्वांनी वाहतूक नियमांचे पालन करुन ट्रिपल सीट, विना हेल्मेट व विरुध्द दिशेन सँग साईड वाहन चालवू नये. अशा प्रकारे नियमांचे ( ) उल्लंघन करणाऱ्या वाहन चालकावर मोटार वाहन कायद्या बरोबर प्रचलित कायद्यान्वये दखलपात्र अपराध दाखल करण्यात येईल. याद्वारे आपणास कळविण्यात येत आहे. वाहतूक नियमांचे पालन करुन पोलीसांना सहकार्य करून होणारे अपघात टाळावेत
SSC-HSC Exam Result दहावी बारावीचा निकाल या तारखेला लागणार
खुलताबाद-कागजीपुरा येथे बालविवाह रोखला; पोलीस प्रशासन घटनास्थळी..