शासन आपल्या दारी- खुलताबादेत वयक्तिक योजनांचे मंजुरी पत्र वाटप
Contact News Publisher
खुलताबाद पंचायत समिती माध्यमातून शासन आपल्या दारी योजना अंतर्गत महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना अंतर्गत दाखल झालेल्या प्रस्तावांना तत्काळ मंजुरी पत्र देऊन लाभार्थ्यांना शासनाकडून योजनांचा लाभ लवकरात लवकर मिळावा म्हणून गटविकास अधिकारी प्रवीण सुरडकर विशेष लक्ष देऊन कार्यवाही करत आहेत यावेळी खुलताबाद पंचायत समितीचे गटविकास अधिकारी प्रवीण सुरडकर यांच्याहस्ते तालुक्यातील तीसगावं तांडा येथील संगीता विनायक सातपुते यांना मजुरी पत्र वाटप करण्यात आले आहे. यावेळी सहाय्यक कार्यक्रम अधिकारी नितीन भवरे, रोजगार सेवक कृष्णा होळकर उपस्थित होते.