राज्य सरकार निर्णय प्रमाणे; 600 रू दराने वाळु पुरवठा करा- खुलताबादेत भाजपची मागणी
Contact News Publisher
महाराष्ट्र सरकारने सुरू केलेल्या नवीन वाळु निर्मिती धोरणानुसार राज्य सरकार मान्य वाळु डेपोमध्ये वाळुचा साठा करून त्यातुन ग्राहकांना प्रती ब्रास 600 रू दराने वाळु पुरवठा करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला असून त्या अंतर्गत औरंगाबाद जिल्ह्यात चार वाळु डेपो प्रस्तावित असल्याचे समजते.खुलताबाद तालुक्यात गोरगरीब जनतेची घरकुल व ईतर कामे सुरू आहेत खुलताबाद तालुक्यातील जनतेची वाळुची मागणी लक्षात घेता खुलताबाद तालुक्यात वाळु डेपो सुरू करण्याबाबत योग्य ती कार्यवाही करण्यात यावी अशी मागणी आज जिल्हाधिकारी साहेब व तहसिलदार सुरेंद्र देशमुख याच्याकडे भाजपा तालुकाध्यक्ष प्रकाश वाकळे यानी एका निवेदनाद्वारे मागणी केली आहे.