September 21, 2024

मोदी सरकारने गोरगरिबांना आणले विकासाच्या प्रवाहात !- केंद्रीय अर्थराज्य मंत्री डॉ.भागवत कराड

0
Contact News Publisher

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वातील केंद्र सरकारने 9 वर्षांचा कार्यकाळ पूर्ण केला. या 9 वर्षात राबविलेल्या सर्व योजना गंगापूर-खुलताबाद मतदारसंघातील जनतेपर्यंत पोहचविण्याचे काम केंद्रीय अर्थराज्य मंत्री डॉ.भागवत कराड, आमदार प्रशांत बंबसह गंगापूर-खुलताबादेत तालुक्यातील भाजप कार्यकर्ते करणार आहेत. अशी माहिती भगवत कराड यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे.

खुलताबाद तहसील श्रावण बाळ योजना 1-5-2023 मंजूर लाभार्थ्यांची यादी

PM Kusum Yojana: आता फक्त याच शेतकऱ्यांना मिळणार पीएम कुसुम सोलर पंप योजनेचा लाभ -नवीन नियम वाचा

खुलताबाद तहसील संजय गांधी योजना; मे 2023 तालुक्यातील प्रत्येक गावांतील मंजूर लाभार्थ्यांची यादी

मोदी सरकारच्या ९व्या वर्षपूर्तीनिमित्त या सरकारच्या कामगिरीची माहिती देण्यासाठी भाजपाने महाजनसंपर्क अभियान आयोजित केले आहे. या अभियानाचाच एक भाग म्हणून डॉ.भागवत कराड, आमदार प्रशांत बंब यांनी पत्रकार परिषदेद्वारे मोदी सरकारच्या कामगिरीचा आढावा घेतला. मोदी सरकारने गेल्या ९ वर्षांत गोरगरीब, वंचित वर्गाच्या मूलभूत गरजांची पूर्तता करण्याचे महत्त्वाचे काम केले. गरीब कल्याण योजनेद्वारे ८० कोटी जनतेला मोफत अन्नधान्य दिले जात आहे. त्याचबरोबर गोरगरिबांसाठी २.५ कोटी घरे आणि ११. ७२ कोटी शौचालये बांधण्यात आली आहेत. ९ कोटींपेक्षा अधिक कुटुंबांना उज्ज्वला योजनेद्वारे मोफत गॅस सिलेंडर दिला जात आहे. मोदी सरकारच्या ९वर्षातील कामगिरीची माहिती देण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत केंद्रीय अर्थराज्य मंत्री डॉ. भागवत कराड खुलताबादेत बोलत होते यावेळी समीरजी राजुरकर, बापुजी घडामोडे,भाजपा तालुकाध्यक्ष प्रकाश वाकळे. गंगापुर तालुकाध्यक्ष शिवनाथ मालकर , जि.प उपाध्यक्ष एल.जी.गायकवाड, मुरलीधर दांडेकर, शहराध्यक्ष सतिश दांडेकर, सभापती गणेश अधाने, प्रभाकर शिंदे, दिनेश अंभोरे, संदिप निकम, युवराज ठेंगडे, उपनगराध्यक्ष सुरेश मरकड, नगरसेवक नवनाथ बारगळ, योगेश बारगळ, परसराम बारगळ, प्रकाश चव्हाण, राहुल निकुंभ, सतिश जैस्वाल , शिवाजी गायकवाड, राजु ठेगडे, गणेश हजारी, अविनाश कुलकर्णी,ज्ञानेश्वर नलावडे,विकास कापसे,सुखदेव ठेगडे, बबन वर्दे, श्रीकांत जाधव, अमोल गवळीसह कार्यकर्ते उपस्थित होते.

खुलताबाद-कागजीपुरा येथे बालविवाह रोखला; पोलीस प्रशासन घटनास्थळी..

खुलताबाद पंचायत समिती एकात्मीक बाल विकास सेवा योजना शिलाई मशीन व सायकल योजना लाभार्थ्यांची यादी

CIBIL : बेस्ट लोन ऑफर पाहिजे? मग आजच credit mantri वर मोफत चेक करा

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Trending