December 4, 2024

मविआ की युती.., महाराष्ट्रात बीआरएस, वंचित बहुजन आघाडी कुणासाठी घातक?

0
Contact News Publisher

गेल्या काही दिवासांपासून महाराष्ट्रातल्या मोठ्या शहरांपासून ते गावांपर्यंत एकाच व्यक्तीचे फ्लेक्स दिसून येतायेत. ‘अबकी बार किसान सरकार’ असं लिहिलेले फ्लेक्स नाक्यानाक्यावर लागायला सुरुवात झाली आहे. तुम्हाला प्रश्न पडला असेल की, हे महाराष्ट्रातल्या एखाद्या नेत्याचे फ्लेक्स असतील, तर ते तसं नाहीये. हे फ्लेक्स आहेत तेलंगाणाचे मुख्यमंत्री आणि भारत राष्ट्र समिती पक्षाचे सर्वेसर्वा केसी राव यांचे. येत्या लोकसभा आणि विधानसभेच्या आधी केसीआर महाराष्ट्रात पाय रोवू पाहत आहेत. त्यातच केसीआर यांना वंचित बहुजन आघाडीची देखील साथ मिळू शकते. त्यामुळे केसीआर आणि वंचितचा नेमका कुणाला फटका बसू शकतो, हे दोन्ही पक्ष कुणासाठी घातक ठरू शकतात? हेच सामजावून घेऊयात…

हेही वाचा: खुलताबाद तहसील संजय गांधी योजना; मे 2023 तालुक्यातील प्रत्येक गावांतील मंजूर लाभार्थ्यांची यादी

 

केसीआर यांनी नांदेडमध्ये सभा घेतली होती. या सभेला जोरदार प्रतिसाद मिळाला होता. काँग्रेस आणि राष्ट्रवादीमधले अनेक नेते केसीआर यांच्या भारत राष्ट्र समिती पक्षात दाखल झाले. नांदेडसोबतच राज्यातील इतर ठिकाणी देखील त्यांनी सभा आणि विविध कार्यक्रम घेतले. आता आषाढी वारीला देखील विठ्ठलाच्या दर्शनाला केसीआर येणार आहेत. केसीआर यांच्या पंढरपूर दौऱ्याबद्दल फडणवीस म्हणाले, ‘पंढरपुरात सगळ्यांचं स्वागत आहे परंतु कोणी राजकारण करु नये.’ राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाच्या कार्यक्रमात अजित पवारांनी केसीआर यांच्या महाराष्ट्रातील वाढत्या सहभागाबाबत इशारा दिला. त्यामुळे केसीआर यांच्या भूमिकेकडे सगळ्यांचेच लक्ष लागले आहे.

खुलताबाद तहसील श्रावण बाळ योजना 1-5-2023 मंजूर लाभार्थ्यांची यादी

प्रकाश आंबेडकर-केसी राव एकत्र येणार?

लोकसभेच्या निवडणुका या वर्षभरावर आहेत. सर्वच राजकीय पक्ष या निवडणुकीच्या तयारीला लागले आहेत. तिकडे विरोधकांनी पाटण्यात बैठक देखील आयोजित केली आहे. अशावेळी वंचितच्या साथीने केसीआर हे महाराष्ट्रात देखील त्यांची पाऊल रोवू लागले आहेत. तेलंगणामध्ये केसीआर यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या भव्य पुतळ्याचे अनावरण केले होते. या कार्यक्रमाला प्रकाश आंबेडकर यांना आमंत्रित करण्यात आले होतं. त्यामुळे केसीआर आणि प्रकाश आंबेडकर येत्या काळात एकत्र येण्याची शक्यता आहे.

“वेरूळ पर्यटनअभ्यागत केंद्रात विक्रेत्यांचे पुनर्वसन करा”अन्यथा आम आदमी पार्टी तर्फे आंदोलनाचा इशारा

त्यातच मागच्या निवडणुकांमध्ये वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांनी लोकसभा तसेच विधानसभेत मोठ्याप्रमाणार मतं घेतली होती. अनेक ठिकाणी काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या उमेदवारांना वंचितच्या उमेदवारांचा फटका बसला होता. त्याचबरोबर वंचितच्या उमेदवारांनी लोकसभेला लाखांमध्ये मतं घेतल्याने वंचितने आपली ताकद देखील दाखवून दिली होती. उद्धव ठाकरे यांनी वंचित सोबत युती केली आहे. परंतु दुसरीकडे महाविकास आघाडीमध्ये वंचितला घेण्याबाबात काँग्रेस आणि राष्ट्रवादी अनुकूल दिसत नाही. आता केसीआर आणि वंचित एकत्र आल्यास त्याचा फटका महाविकास आघाडीला मोठ्याप्रमाणावर बसू शकतो.

Annasaheb patil loan scheme : उद्योगासाठी 15 लाख कर्ज मिळणार अर्ज करण्याचे आवाहन

महाराष्ट्रातील नेते बीआरएसच्या वाटेवर

प्रकाश आंबेडकरांनी निवडणुकांची तयारी सुरु केली आहे. मुंबई आणि इतर भागांमध्ये त्यांच्या सभा पार पडल्या आहेत, त्याचबरोबर संघटनात्मक बांधणीकडे देखील त्यांनी लक्ष दिले आहे. दुसरीकडे केसीआर देखील काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील नाराज नेत्यांना आपल्या पक्षाकडे वळवताना दिसत आहेत. राज्यात काही दिवसांपूर्वी जाहिरातींवरुन राजकारण रंगलेलं असताना केसीआर देखील आपला ठसा जाहीरातींमधून उमटवता दिसत आहेत. अनेक वृत्तपत्र आणि वाहिन्यांवर ‘अबकी बार किसान सरकार’ म्हणत केसीआर जाहीरात करत आहेत. आता थेट नाशिकच्या कांद्याला तेलंगणामध्ये भाव देऊन शेतकऱ्यांना आपलंस करण्याचा केसीआर यांचा मनसुबा आहे.

खुलताबाद पंचायत समिती एकात्मीक बाल विकास सेवा योजना शिलाई मशीन व सायकल योजना लाभार्थ्यांची यादी

त्यातच वंचितची ताकद गेल्या निवडणुकांमध्ये दिसून आली आहे. मराठवाडा तसेच विदर्भात वंचितची मोठी ताकद आहे तिकडेच केसीआर यांनी देखील लक्ष केंद्रीत केलं आहे. त्यामुळे येत्या काळात हे दोन पक्ष आले तर याचा फटका काँग्रेस आणि राष्ट्रवादीला बसू शकतो. म्हणूच अजित पवार असो की अशोक चव्हाण केसीआर आणि वंचितच्या वाढत्या प्रभावावरुन इशारा देताना दिसत आहेत. आता येत्या निवडणुकांमध्ये हे दोन पक्ष एकत्र येतात का आणि आले तर काय प्रभाव पाडतात हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Trending