September 21, 2024

खुलताबाद : रात्री साडेदहाच्या नंतर विनाकारण घराबाहेर आढळल्यास कार्यवाही

0
Contact News Publisher
  • क्राईम टाईम्स ब्युरो
  • नावेद शेख

काल रात्री खुलताबाद शहरात काही मुलांनी शुल्लक कारणावरून वाद करून वातावरण खराब करण्याचा प्रयत्न केला परंतु खुलताबाद पोलीसांनी वेळीच हस्तक्षेप केल्याने काही अनुचित प्रकार घडवून आलेला नाही याप्रकरणी पोलिसांनी दखल घेत खुलताबाद शहरातील शांतता कमिटी सदस्यांची बैठक घेऊन शांतता प्रस्थापित करण्याचे आव्हान केले व प्रतिष्ठित नागरीकांनी देखील सहकार्य करण्याचे अश्वासन दिले आहे. सर्व प्रस्थीतीचा विचार करता व येणाऱ्या काळात सण उत्सव शांततेत पार पाडावे, शांतता राहावी करीता शहरात व तालुक्यात एक ही स्थापना (मेडीकल, दवाखाने वगळून) चहाचे, हॉटेल, पानटरी, किराणा दुकान, गॅरेज व इतर स्थापना हे शासनाने ठरविल्या नियमा प्रमाणे रात्री साडेदहा (10:30) वाजे नंतर चालु राहणार नाही तसेच त्या स्थापना मालकांनी इतर लोकांना, मुलांना देखील थांबु देवु नयेत याची दक्षता घ्यावी तसेच रात्री साडेदहा नंतर कोणताही व्यक्ति चहाचे हॉटेल, पानटपरी, दर्गा परिसर, मंदिर परिसर, गल्लीत, रोडवर विनाकारण थांबणार नाही तसे आढळून आल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल याची नागरीकांनी नोंद घ्यावी अशी माहिती खुलताबाद ठाण्याचे पोलीस निरीक्षक भुजग हातमोडे यांच्या वतीने देण्यात आली यावेळी मंदिर कमिटीचे अध्यक्ष मिठु पाटिल बारगळ, २२ ख्वाजा कमिटीचे अध्यक्ष शरफोद्दीन शेख, अॅड कैसोरोद्दीन, समद शेख (टेलर), ज्ञानेश्वर बारगळ, नगरसेवक मुनिबबोद्दीन, शेख मुजिब, शौकत सय्यद, खुलताबाद शहर बिट अंमलदार जाकीर शेखसह इतर उपस्थित होते.

खुलताबाद तालुक्यात अंगणवाडी सेविका मदतनीस भरती; येथे करा अर्ज

स्वस्त धान्य दुकान परवाना मिळण्यासाठी अर्ज करण्याचे आवाहन

खुलताबाद तहसील संजय गांधी योजना; मे 2023 तालुक्यातील प्रत्येक गावांतील मंजूर लाभार्थ्यांची यादी

श्रावण बाळ योजना मंजूर लाभार्थ्यांची यादी

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Trending