गुड न्यूज! एकाच वेळी विद्यार्थ्यांना घेता येणार दोन पदव्या
एमजीएम विद्यापीठात आता एकाच वेळी विद्यार्थ्यांना दोन पदव्या घेता येणार आहेत. विद्यापीठाने नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० लागू केले आहे. एकदाच २ पदव्या मिळवण्यासाठी आवश्यक असलेले क्रेडिटस् विद्यार्थ्यांना पूर्ण करावे लागणार असल्याची माहिती एमजीएम विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विलास सपकाळ यांनी पत्रकार परिषदेत दिली.
खुलताबाद तालुक्यात अंगणवाडी सेविका मदतनीस भरती; येथे करा अर्ज
स्वस्त धान्य दुकान परवाना मिळण्यासाठी अर्ज करण्याचे आवाहन
एमजीएम विद्यापीठाने नव्या शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणीसाठी केलेल्या प्रयत्नांची माहिती देण्यासाठी प्रशासकीय इमारतीमध्ये पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते. यावेळी डॉ. सपकाळ म्हणाले, तंत्रज्ञानाच्या युगामध्ये नागरिकांना ग्लोबल सिटीझन बनविण्याच्या उद्देशाने नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची निर्मिती करण्यात आली आहे. त्यामुळे शिक्षण क्षेत्रात अमुलाग्र बदल होत आहे.
Location Tracker by Mobile Number : मोबाईल नंबर टाकून कोणाचेही लाईव्ह लोकेशन (चेक करा) बघा
खूप झाल्या घोषणा!! “शेतकऱ्यांना अतिवृष्टीचे अनुदान द्या आम आदमी पक्षाची मागणी”
या बदलांना एमजीएम विद्यापीठ प्रभावीपणे सामोरे गेले असून, अंमलबजावणीस सुरुवात झाल्याचेही त्यांनी सांगितले. विद्यापीठातील सात विद्याशाखा असून, एकदा विद्यार्थ्याने विद्यापीठात प्रवेश केल्यानंतर त्याला कोणत्याही विद्याशाखेत शिक्षण पूर्ण करता येणार आहे. या शाखांमधील मेजर आणि मायनर विषय निवडण्याचे स्वातंत्र्य विद्यार्थ्यांस असणार आहे. त्यानुसार एकाच वेळी दोन पदव्याही विद्यार्थ्या घेता येऊ शकतात असेही त्यांनी स्पष्ट केले.
गाय म्हैस अनुदान योजना : गाय 70 म्हशीसाठी 80 हजार अनुदान -येथे करा ऑनलाईन अर्ज
“वेरूळ पर्यटनअभ्यागत केंद्रात विक्रेत्यांचे पुनर्वसन करा”अन्यथा आम आदमी पार्टी तर्फे आंदोलनाचा इशारा