सोशल मीडियावर प्रेम जुळले अन्, १४ वर्षीय मुलगी थेट शहरात आली, अन्…
सोशल मीडियावर प्रेम जुळल्यानंतर प्रियकराच्या ओढीने पुणे येथील एका १४ वर्षीय अल्पवयीन मुलगी वाळुजला आली. यानंतर हे प्रेमप्रकरण अंगलट येईल, असे दिसताच नातेवाईकांनी गुरुवारी या प्रेमी युगलास एमआयडीसी वाळूज पोलिसांच्या स्वाधीनही केले.
पुणे जिल्ह्यातील खडकी येथील रहिवासी (१४, ) या अल्पवयीन मुलीची सोशल मीडियावर वेरुळ येथील एका हॉटेलवर काम करणाऱ्या एका १८ वर्षाच्या तरुणां सोबत वर्षभरापूर्वी ओळख झाली होती. या ओळखीनंतर सोशल मीडियावरून दररोज चॅटींग व संभाषणानंतर x1 व x2 यांचे प्रेम जुळले. विशेष म्हणजे, x1 याच्या घरची परिस्थिती हलाखीची असून प्रियाचीही आर्थिक परिस्थिती जेमतेम आहे. या प्रेमप्रकरणानंतर x1 व x2 या दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. अशातच x2 हिने ३ जुलै रोजी घरच्यांचा डोळा चुकवत प्रियकर x1 यास भेटण्यासाठी पुणे येथून बसने थेट वाळूजला आली. उद्योगनगरीत पोहोचताच x2 हिची वाट बघणाऱ्या x1 याने तिला सोबत घेत पाटोदा येथे एका नातेवाईकाच्या घरी घेऊन गेला. X2 ही घरातून गायब झाल्याने तिच्या पालकांनी तिचा नातेवाईक व परिसरात सर्वत्र शोध घेतला. X2 हिच्याकडे असलेला मोबाइलही बंद असल्याने तसेच तिचा शोध लागत नसल्याने तिच्या पालकांनी x2 हिचे अपहरण झाल्याची तक्रार पुण्यात दाखल केली होती.
गत तीन दिवसांपासून x1 व x2 हे प्रेमीयुगल पाटोद्यात नातेवाईकांच्या घरी मुक्कामाला होते. X2 ही अल्पवयीन असल्याने तसेच ती x1सोबतच राहण्याचा हट्ट धरीत असल्याने x1 याच्या नातेवाईकांनी प्रकरण अंगलट येईल या भीतीपोटी दोघांना सोबत घेऊन गुरुवारी एमआयडीसी वाळूज पोलिसांच्या स्वाधीन केले. घटनेचे गांभीर्य ओळखून पोलिस निरीक्षक अविनाश आघाव, उपनिरीक्षक संदीप शिंदे, महिला पोलिस कर्मचारी प्रियंका तळवंदे यांनी x2 हिचे समुपदेशन करून पुण्यात तिच्या नातेवाईकांशी संपर्क साधला. X2 हिच्या पालकांनी ती बेपत्ता झाल्याची तक्रार पुण्यातील पोलिस ठाण्यात दिल्याचे सांगितले. यानंतर पुणे पोलिस x2 हिच्या पालकांना सोबत घेऊन तिला आणण्यासाठी उद्योगनगरीकडे निघाले असल्याचे पोलिस निरीक्षक अविनाश आघाव यांनी सांगितले.