औरंगाबाद जिल्हा माहिती अधिकारी पदावर डॉ. मिलिंद दुसाने रुजू; मुकुंद चिलवंत यांची सिधुदुर्ग येथे बदली
औरंगाबाद : सामान्य प्रशासन विभागाअतंर्गत माहिती व जनसंपर्क महसंचालनालयातील वर्ग 1 संवर्गातील अधिकारी यांच्या बदलीचे आदेश निर्गमित करण्यात आले होते. यामध्ये औरंगाबाद जिल्हा माहिती अधिकारी पदी डॉ. मिलिंद मधुकर दुसाने यांची बदली करण्यात आली आहे. आज त्यांनी जिल्हा माहिती अधिकारी औरंगाबाद या पदाचा कार्यभार स्वीकारला .तसेच मुकुंद चिलवंत यांची बदली जिल्हा माहिती अधिकारी सिधुदुर्ग येथे झाली असल्याने त्यांना जिल्हा माहिती कार्यालय, संचालक माहिती कार्यालय व माहिती केंद्र यांच्या वतीने निरोप देण्यात आला.
खुलताबाद : रात्री साडेदहाच्या नंतर विनाकारण घराबाहेर आढळल्यास कार्यवाही
आर्थिक उन्नतीला चालना देणारी दुधाळ जनावरांची गट वाटप योजना; क्लिक करून ऑनलाइन अर्ज करा..
मराठवाडा विभागाचे संचालक (माहिती) किशोर गांगुर्डे, माहिती अधिकारी डॉ. मीरा ढास, सहायक संचालक गणेश फुंदे, यांच्यासह कार्यालयातील कर्मचारी उपस्थित होते. यावेळी संचालक किशोर गांगुर्डे यांनी पदभार स्विकारल्याबदल डॉ. मिलिंद दुसाने याचे स्वागत केले तसेच जिल्हा माहिती अधिकारी मुकुंद चिलवंत यांना शुभेच्छा दिल्या.
स्वस्त धान्य दुकान परवाना मिळण्यासाठी अर्ज करण्याचे आवाहन
डॉ. मिलिंद दुसाने यांनी एमएस्सी (भुगर्भशास्त्र), एमसीजे (कम्युनिकेशन ॲण्ड जर्नालिझम), ही पत्रकारिता पदवी संपादन केल्यानंतर “दादा कोंडके यांच्या चित्रपटातील राजकीय सामाजिक आशयांचा विश्लेषणात्मक अभ्यास”या विषयात डॉक्टरेट,पीएच. डी पदवी संपादन केली आहे.ते 1997 पासून माध्यमांत कार्यरत असून आकाशवाणी धुळे येथे नैमित्तीक उद्घोषक, कलावंत, लेखक म्हणून (1997 ते 2010 पर्यंत) याकालावधीत विविध रेडिओ फिचर्स लेखन, सादरीकरण, अहिराणी भाषेत श्रृतिका लेखन केले आहे .
सन 2000 मध्ये देशपातळीवर सर्वोत्कृष्ट रेडिओ फिचर लेखनाचे मानांकन, सन 2000 पासून दैनिक लोकमत धुळे येथे उपसंपादक म्हणून काम करीत असताना त्यांना उत्कृष्ट वार्ता पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. आकाशवाणी व दूरदर्शन प्रतिनिधी म्हणून 2006 ते 2010 पर्यंत धुळे व नंदुरबार जिल्ह्यात काम केले. 2010 पासून महाराष्ट्र शासनाच्या माहिती व जनसंपर्क विभागात सहायक संचालक म्हणून ते रुजू झाले. मंत्रालयात वृत्तचित्र शाखेत ‘जय महाराष्ट्र’ या कार्यक्रमाची सह्याद्री दूरदर्शन वाहिनीवरून प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमाच्या 420 भागाची निर्मिती केली. माहिती व जनसंपर्क महासंचालनालयासाठी अनेक माहितीपट निर्मिती. ‘लाडकी’ या अनुबोधपटाची निर्मिती. जिल्हा माहिती अधिकारी म्हणून नाशिक, जळगाव, रायगड-अलिबाग, रत्नागिरी, ठाणे येथे जबाबदारी पार पाडली. पदोन्नतीनंतर अकोला येथे कार्यरत असताना बुलडाणा येथिल अतिरिक्त कार्यभारही दोन वर्षे सांभाळला आहे.
डॉ. दुसाने यांचे अनेक वृत्तपत्र, नियतकालिकांमध्ये लेखन प्रकाशित झाले असून, संशोधनपर मासिकांत शोध निबंध प्रकाशितआहेत.