फोटो व्हायरल करण्याची धमकी देऊन फर्दापूर येथील हॉटेलवर युवतीवर बलात्कार

फर्दापूर येथील हाॅटेलवर २३ वर्षीय युवतीला आणून मोबाइलमध्ये फोटो काढून फोटो व्हायरल करण्याची धमकी देऊन वेळोवेळी शरीरसंबंध करणाऱ्यावर फर्दापूर पोलिस ठाण्यात पीडित युवतीच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
खुलताबाद तालुक्यात अंगणवाडी सेविका मदतनीस भरती; येथे करा अर्ज
स्वस्त धान्य दुकान परवाना मिळण्यासाठी अर्ज करण्याचे आवाहन
शेंदुर्णी (ता. जामनेर) येथील रहिवासी कपिल संजय भोई (२४) याने २३ वर्षीय युवतीला ९ सप्टेंबर २०२२ रोजी फर्दापूर येथे घेऊन आला व येथील हाॅटेलवर रूम बुक करून तिला धमकावून मोबाइलमध्ये फोटो काढून शारीरिक संबंध ठेवले व वेळोवेळी धमक्या देऊन अश्लील फोटो व्हायरल करीन, अशा धमक्या देत ब्लॅकमेल करून शारीरिक संबंध ठेवले.
गाय म्हैस अनुदान योजना : गाय 70 म्हशीसाठी 80 हजार अनुदान -येथे करा ऑनलाईन अर्ज
१४ फेब्रुवारी २०२३ रोजी पीडित युवतीला फर्दापूर येथे घेऊन आला. फर्दापूर येथील दुसऱ्या हाॅटेलवर शारीरिक संबंध केले. पीडित युवतीने ८ जून रोजी फर्दापूर पोलिस ठाण्यात येऊन कपिल संजय भोई याच्याविरोधात तक्रार दाखल केली. या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पाेलिस उपनिरीक्षक वाघुले पिंक पथक उपविभाग सिल्लोड करत आहे. आरोपीला अद्याप अटक करण्यात आलेली नसून आरोपीच्या शोधात पथक रवाना झाले आहे. त्याला लवकरच ताब्यात घेण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.
CIBIL: आपला सिबिल/क्रेडीट स्कोर पहा आपल्या मोबाईलवर फक्त दोन मिनिटात
जमिनीचा गट नंबर टाका अन् आपल्या जमिनीचा नकाशा पहा : आपल्या मोबाईलवर फक्त 2 मिनिटात