September 21, 2024

शेतकऱ्यांबाबत अहवाल देणाऱ्या सुनील केंद्रेकरांवर गुन्हा दाखल करा; शिरसाट यांची मागणी

0
Contact News Publisher

शेतकरी आत्महत्या चिंतेचा विषय बनला असून, या आत्महत्या थांबवण्यासाठी तत्कालीन विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी मराठवाड्यातील आठही जिल्ह्यातील 10 लाख शेतकऱ्यांचा एक सर्वेक्षण केला होता. ज्यात एक लाखांपेक्षा अधिक शेतकऱ्यांच्या मनात आत्महत्या करण्याचा विचार सुरु असल्याचा अहवाल सरकार देण्यात आला आहे. यावरून आता राजकीय प्रतिकिया देखील येत असून, या अहवालावरच शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केला आहे. हा अहवाल जर खोटा ठरल्यास केंद्रेकर यांच्यावर गुन्हा दाखल केला पाहिजे, असे शिरसाट म्हणाले आहे.

ऐकावे ते नवलचं !! प्रेयसींला ‘इम्प्रेस’ करण्यासाठी तब्बल ३०० मोबाइलची चोरी; ३ अल्पवयीन मित्रांचा कारनामा

धक्कादायक! प्रियकराच्या मदतीने नवऱ्याचा काटा; घरात दिली फाशी, मृतदेह फेकला घाटात

गंगापूर-खुलताबाद विधानसभा २०२४; इच्छुकांच्या गर्दीत डॉ.मझर खान यांची एन्ट्री..

पत्रकार परिषदेत बोलतांना शिरसाट म्हणाले की, “अत्यंत चुकीचा रिपोर्ट सुनील केंद्रेकर यांनी काढला आहे. त्यांनी जो अहवाल दिला आहे, त्यावरून संताप डोक्यात गेलेला आहे. या अहवालाची चौकशी करा, जर तो खरा असेल त्यानुसार कारवाई केली पाहिजे. जर तो चुकीचा रिपोर्ट असेल शेतकऱ्यांना आत्महत्यासाठी प्रवृत्त करणारा हा रिपोर्ट असेल तर यांच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे. मी मुख्यमंत्र्याकडे कालच याबाबत मागणी केलेली आहे. तर विभागीय आयुक्त म्हणून तुमची काही जबाबदारी नव्हती का?, नोकरी गेल्यावर पोपटासारखे काय बोलता? शेतकरी उभा कसा राहील, याकडे लक्ष द्या, शेतकरी आत्महत्या कसे करतात याकडे तुमचे लक्ष आहे का? असे शिरसाट म्हणाले. तर तुमची राजकीय व्यक्तींसारखा स्टेटमेंट आणि अहवाल देतायत. त्यामुळे त्यांना त्यांची जागा दाखवली जाईल. जर अहवाल चुकीचा असेल तर निश्चित गुन्हा दाखल केला जाईल. सुनील केंद्रेकर यांच्या विरोधात ईडीची चौकशी चालू असल्याचे शिरसाट म्हणाले आहे.

खुलताबाद तहसील संजय गांधी योजना; मे 2023 तालुक्यातील प्रत्येक गावांतील मंजूर लाभार्थ्यांची यादी

खुलताबाद तालुक्यात अंगणवाडी सेविका मदतनीस भरती; येथे करा अर्ज

दवाखान्याचे टेन्शन मिटले; राशन कार्ड कोणतेही असो आता ५ लाखांपर्यंतचे उपचार मोफत!; समजून घ्या..

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Trending