September 21, 2024

बीजभांडवल कर्ज योजनेचे अर्ज सादर करण्याचे आवाहन- औरंगाबाद विकास महामंडळ

0
Contact News Publisher

वैयक्तिक कर्ज व्याज परतावा, गट कर्ज व्याज परतावा योजना, शैक्षणिक कर्ज व्याज परतावा योजना व महिला स्वंयसिद्धी व्याज परतावा योजनांसाठी महामंडळाच्या www msobcfdc.org या वेबसाईटवर ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याचे आवाहन इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळ यांच्या मार्फत करण्यात आले आहे. तसेच थेट कर्ज योजना व बीजभांडवल कर्ज योजनेच्या अर्जासाठी जिल्हा कार्यालयाशी कार्यलयीन वेळेत संपर्क साधावा.

दवाखान्याचे टेन्शन मिटले; राशन कार्ड कोणतेही असो आता ५ लाखांपर्यंतचे उपचार मोफत!; समजून घ्या..

महाराष्ट्र राज्य इतर महामंडळामार्फत राबवल्या जाणाऱ्या कर्ज योजनांचे सन 2023 -24 या आर्थिक वर्षासाठी बीजभांडवल योजनेचे 46, थेट कर्ज योजनेचे ग्रामीण भागासाठी 120 व शहरी भागासाठी 70 उद्दिष्ट देण्यात आले आहे. वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजनेचे 122, गट कर्ज व्याज परतावा साठी 13 शैक्षणिक कर्ज व्याज परतावा साठी 11 व महिला स्वंयसिद्धी व्याज परतावा योजनेचे 14 हजार 444 उद्दीष्ट प्राप्त झाले आहे.

स्वस्त धान्य दुकान परवाना मिळण्यासाठी अर्ज करण्याचे आवाहन

योजनांच्या अधिक माहितीसाठी महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित आणि विकास महामंडळ, दुसरा मजला, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, शिवाजी हायस्कुलच्या बाजुला, खोकडपुरा, औरंगाबाद (दुरध्वनी क्र. 0240 -2331544) येथे कार्यालयीन वेळेत संपर्क साधावा.
20 टक्के बीजभांडवल योजना- सदर योजना राष्ट्रीयकृत बॅंका व जिल्हा मध्यवर्ती बॅंकांच्या माध्यमातून राबविण्यात येते. यात महामंडळाचे कर्ज 20 टक्के, बॅंकेचे कर्ज 75 टक्के व लाभार्थीचा सहभाग 5 टक्के असतो, कर्ज सहभागांची रक्कम बॅंकेने एकूण मंजूर केलेल्या कर्ज रकमेवर असते. कर्ज रक्कम मर्यादा रु. 5 लक्ष आहे. कर्ज फेडीची कालमर्यादा 5 वर्षे असून व्याजदर महामंडळाच्या सहभाग रकमेवर 6 टक्के व बॅंकेच्या सहभाग रकमेवर प्रचलीत बॅक व्याज दरानुसार आहे. कुटुंबाची वार्षिक उत्पन्न मर्यादा रु. 1 लाख पर्यंत असेल. अर्जदाराचे वय 18 ते 50 वर्ष पर्यंत आहे.

कुसुम योजना – सौरपांपसाठी ऑनलाईन अर्ज करणे सुरू असा करा अर्ज

थेट कर्ज योजना – सदर योजना महामंडळामार्फत राबविण्यात येते. कर्ज मर्यादा रुपये 1 लाख पर्यंत आहे. अर्जदाराचा सिबील स्कोअर किमान 500 इतका असावा. वय 18 ते 55 वर्षेपर्यंत असून परत फेडीचा कालावधी 4 वर्षे आहे. नियमित कर्ज परतफेड करणाऱ्या लाभार्थ्यांना व्याज आकारले जाणार नाही (हप्ता मासिक रु. 2085) असेल तसेच थकीत कर्ज रकमेवर 4 टक्के व्याज आकारण्यात येते. कुटुंबाची वार्षिक उत्पन्न मर्यादा रु. 1 लाख पर्यंत असेल.
वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजना- सदर योजना बॅंके मार्फत राबविण्यात येते. कर्ज मर्यादा रुपये 10 लाख पर्यंत आहे. महामंडळाच्या वेबपोर्टल, संगणक प्रणालीवर नोंदणी अनिवार्य आहे.कुटुंबाची वार्षिक उत्पन्न मर्यादा रु. 8 लाख पर्यंत आहे. कर्ज परतफेडीच्या कालावधी बँक निकषानुसार असणार आहे. कर्ज रकमेचे हप्ते नियमित भरल्यास व्याज परतावा रक्कम महामंडळ नियमानुसार लाभार्थीच्या आधार लिंक खात्यावर दरमहा जमा करण्यात येईल.

जमिनीचा गट नंबर टाका अन् आपल्या जमिनीचा नकाशा पहा : आपल्या मोबाईलवर फक्त 2 मिनिटात

पात्र लाभार्थीस L.O.I ( Letter of Intent) दिले जाईल त्या आधारे बॅकेकडून कर्ज मंजूर करुन घ्यावे लागेल.
गट व्याज परतावा योजना- सदर योजना बँकेमार्फत राबविण्यात येते. महामंडळाच्या निकषानुसार विहित केलेल्या वार्षिक उत्पन्न मर्यादेतील बचतगट भागीदारी, सहकारी संस्था शासन प्रमाणित आहे. कर्ज मर्यादा रुपये 10 ते 50 लाख पर्यंत आहे. महामंडळाच्या वेबपोर्टल, संगणक प्रणालीवर नोंदणी करणे आवयश्यक आहे. गटातील सर्व लाभार्थीचे खाते आधार लिंक असणे गरजेचे आहे. गटातील लाभार्थीचे वय 18 ते 45 वर्षे पर्यंत आहे. गटातील भागीदारांचे खाते किमान रु. 500 कोटींच्या वर ठेवी असलेल्या व कोअर बॅकींग सिस्टीम असलेल्या राष्ट्रीयकृत, शेडयुल्य बॅंकेत खात असावे. गटातील सदस्यांनी यापुर्वी महामंडळाच्या वा इतर महामंडळाच्या कोणत्याही योजनांचा लाभ घेतलेल्या नसावा. गटातील सर्व सदस्यांचा सिबील स्कोअर किमान 500 असावा. कर्ज परतफेडीचा कालावधी 5 वर्षे वा कर्ज कालावधी या पैकी जो कालावधी कमी असेल. कर्ज रकमेचे हप्ते नियमित भरल्यास व्याज परतावा रक्कम महामंडळ नियमानुसार लाभार्थींच्या आधार लिंक खात्यात दरमहा जमा करण्यात येईल. पात्र गटास L.O.I. दिले जाईल त्या आधारे बँकेकडून कर्ज मंजुर करुन घ्यावे लागेल.

घरकुल योजना | नवीन घरकुलांना मंजुरी यादी ; शासन निर्णय पहा

शैक्षणिक कर्ज व्याज परतावा योजना- सदर योजना बॅकेमार्फत राबवण्यात येते. बॅंक कर्ज रकमेवरील व्याज परतावा. देशांतर्गत व पदरेशी उच्च शिक्षणासाठी रु. 10 ते 20 लाखापर्यंत आहे. महामंडळाच्या वेबपोर्टल संगणक प्रणालीवर नोंदणी गरजेचे आहे. विद्यार्थीचे वय 17 ते 30 वर्षेपर्यंत मर्यादा आहे.अर्जदाराची कौटुंबिक वार्षिक उत्पन्न रुपये 8 लाखापर्यंत आहे.अर्जदार हा 12 वी व 60 टक्के गुणांसह उर्त्तीण असणे आवश्यक आहे. देशांतर्गत अभ्यासक्रम आरोग्य विज्ञान, अभियांत्रिकी, व्यावसायिक व व्यवस्थापन, कृषी, अन्नप्रक्रिया व पशुविज्ञान असा असेल. परदेशी अभ्यासक्रम आरोग्य विज्ञान, अभियांत्रिकी, व्यावसायिक व व्यवस्थापन असेल. बॅंकेने उपलब्ध करुन दिलेल्या कर्जामध्ये फक्त शैक्षणिक शुल्क, पुस्तके व साहित्य खरेदीचा सामावेश राहील. परदेशी अभ्याक्रमांसाठी (Quacquarelli Symonds) रॅकींग, गुणवत्ता निकषांनुसार संस्थेचे स्थान 200 चे आत असणे आवश्यक आहे. परदेशी अभ्याक्रमाकरीता पात्र परिक्षा GRE & Graduate Record Exam), TOEFL ( Tset of English os Foreign Language) परीक्षा उत्तीर्ण होणे आवश्यक आहे.

Facebook

कौशल्य विकास प्रशिक्ष्ज्ञण योजना – राज्यातील इतर मागासवर्गीय समाजातील परंपरागत व्यवसायाचे आधुनिकीकरण झालेले असल्यामुळे त्या परंपरागत व्यवसायात कार्यरत असलेल्या तसेच इतर शैक्षणिक पात्रता धारण केलेल्या इतर मागासवर्गीय समाजातील पात्र व्यक्तींना आधुनिक प्रशिक्षणाचा लाभ व्हावा तसेच कौशल्य विकास प्रशिक्षण प्रदान करुन त्यांना कौशल्यपुर्ण बनविणे व त्याद्वारे रोजगार किंवा स्वयंरोजगार उपलब्ध करुन देणे.
सदर योजनेत वर्यामर्यादा 18 ते 50 वर्षे असावे व 10 पास आवश्यक आहे. महामंडळाच्या, MSSDS च्या वेबपोर्टलवर उमेदवाराने नांव नोंदणी करणे अनिवार्य आहे. इतर मागासवर्गीय प्रवर्गाचे जात प्रमाणपत्र, एकत्र कुटुंबाचे उत्पन्न प्रमाणपत्र (8 लाख पर्यंत) वयाचा दाखला, रहिवासी दाखला, आधार कार्ड अपलोड करावे लागेल. बाजारपेठेत उपलब्ध असलेल्या सेवा, नोकऱ्यांची मागणी विचारात घेऊन प्रशिक्षण अभ्यासक्रम महामंडळामार्फत निवडण्यात येईल. महामंडळाने निवड केलेल्या अभ्यासक्रमातून उमेदवारास त्यांच्या कल चाचणीच्या आधारावर अभ्यासक्रमाची निवड येईल. स्किल इंडीया पोर्टलवर नोदंणी केलेल्या प्रशिक्षण संस्थेमार्फत प्रशिक्षण देण्यात येईल. संपुर्ण प्रशिक्षण महामंडळामार्फत देण्यात येईल. प्रशिक्षणादरम्यान दैनंदिन हजेरी अनिवार्य राहील.

डाक सेवक भरती १६ फेब्रुवारीपर्यंत ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन

महिला स्वयंसिद्धी व्याज परतावा योजना- इतर मागास प्रवर्गातील महिलांचे सक्षमीकरण करुन त्यांना स्वावलंबी व आत्मनिर्भर बनवणे. बचत गटातील महिलांनी उत्पादीत केलेल्या वस्तुंचे उत्पादन, प्रक्रिया, मुल्य आधारित उद्योगांकरीता बॅंकेमार्फत मंजुर केलेल्या रु. 5 लाख ते 10 लक्ष पर्यंतच्या कर्ज रकमेवरील 12 टक्के व्याजाच्या मर्यादेत व्याज परतावा महामंडळाकडून उपलब्ध करुन देण्यात येईल. महामंडळाच्या वेबर्पार्टल, संगणक प्रणालीवर नोंदणी अनिवार्य आहे. महिला आर्थिक विकास महामंडळाच्या सीएमआरसी मार्फत शिफारस केलेल्या महिला बचत गटात किमान 50 टक्के इतर मागास प्रवर्गातील महिला असतील असा बचत गट व्याज परतावा योजनेसाठी पात्र राहील.

म्हैसमाळ येथे दोन प्रेम युगलांवर दामिनीसह विशेष पथक’ची कारवाई

पात्र महिला बचत गटातील इतर मागास प्रवर्गाच्या महिला अर्जदारांना सदर व्याज परतावा योजनेचा लाभ महामंडळाकडून घेता येईल. प्रथम टप्यात 5 लाखापर्यंत कर्ज बॅंकेकडून उपलब्ध करुन घेण्यास मान्यता देण्यात येईल. प्रथम टप्यातील कर्ज नियमित फेडल्यानंतर द्वितीय टप्यात 10 लक्ष पर्यंत कर्ज बॅकेकडून मंजुर करुन घेण्यास पात्र होईल. L.O.I (पात्रता प्रमाणपत्र) द्वारे बॅंकेने मंजुर केलेल्या आणि नियमित कर्ज परतफेड केलेल्या बचत गटास 12 टक्के पर्यंतच्या व्याज मर्यादेत व्याज परतावा बॅक प्रमाणीकरणानुसार मिळेल.

Videos

लाभार्थी महाराष्ट्र राज्याचा इतर मागावर्गीय रहीवासी असावा. तो महामंडळाचा, बॅंकेचा अथवा कोणत्याही वित्तीय संस्थेचा थकबाकीदार नसावा. कुटुंबातील एकाच व्यक्तीस योजनेचा लाभ घेता येईल. अर्जदाराने जो व्यवसाय निवडला असेल त्याचे त्याला ज्ञान किंवा अनुभव असावा. कर्जाच्या अटी व शर्ती महामंडळ ठरवेल त्याप्रमाणे राहतील. सर्व व्याज परतावा योजनांसाठी लाभर्थीने कर्ज मंजुरीसाठी बँकेकड जाण्यापुर्वी महामंडळाचे L.O.I. पात्रता प्रमाणपत्र घेणे अनिवार्य आहे.

कृषी विभागात सरळसेवेने विविध पदभरतीसाठी अर्ज करण्यास २२ जुलैपर्यंत मुदत

 

या योजनेचे पात्रतेचे निकष अर्जदाराने जो व्यवसाय निवडला असेल त्याचे त्याला ज्ञान किंवा अनुभव असावा. कर्जाच्या अटी व शती महामंडळ ठरवेल त्याप्रमाणे राहातील.असे महाराष्ट्र राज्य इतर मागावर्गीय, वित्त आणि विकास महामंडळा लि. चे जिल्हा व्यवस्थापक यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Trending