September 21, 2024

खुलताबाद तहसील कर्मचाऱ्यांना मिळणार हक्काचे निवासस्थान; 5 कोटी मंजूर, आ. बंब यांची माहिती

0
Contact News Publisher

“खुलताबाद तहसिल कार्यालयाच्या कर्मचारी करीता शासकिय निवास्थानांचे बांधकाम” करणेसाठी राज्य शासनाकडून रु.5.00 कोटी निधीला मान्यता मिळाली आहे

  • क्राईम टाईम्स ब्युरो
  • नावेद शेख

खुलताबाद येथील तहसिल कार्यालयीन कर्मचारी यांचे शासकिय निवास्थानांची दुरावस्था झालेली होती. त्यामुळे तहसिल कार्यालयीन कर्मचारी यांचेसाठी शासकिय निवास्थान बांधकाम करणेसाठी; राज्य शासनाकडे सततचा पाठपुरावा करुन “खुलताबाद तहसिल कार्यालयाच्या कर्मचारी करीता शासकिय निवास्थानांचे बांधकाम” करण्यासाठी राज्य शासनाकडून रु.5.00 कोटी निधीसह मान्यता मिळाली आहे. ज्याची प्रत सहपत्रासोबत जोडली आहे.
त्यामुळे तहसिल कार्यालयातील कर्मचारी यांचेसाठी प्रशस्त निवास्थांची उभारणी करण्यात येणार असुन, अत्याधुनिक सोयी-सुविधा उपलब्ध करुन देण्यात येणार आहे अशी माहिती आमदार प्रशांत बंब यांच्याकडून देण्यात आली आहे.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Trending