September 21, 2024

ऑनलाईन मतदार यादीत नाव नोंदणी व दुरुस्ती सुरू; येथे क्लिक करून करा नोंदणी- जिल्हाधिकारी

0
Contact News Publisher

नवमतदार नाव नोंदणी करावी-जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांचे आवाहन

औरंगाबाद– मतदार जनजागृती अभियानांतर्गत नव मतदारांनी नाव नोंदणी करावी, तसेच नागरिकांना आता वोटर हेल्पलाईन या मोबाईल ॲपद्वारे आपले नाव मतदार यादीत नोंदवणे, नाव वगळणे, पत्ता बदल इ. बाबतची कामे स्वतः घरबसल्या करता येणार आहेत. नागरिकांनी यासेवेचा लाभ घ्यावा,असे आवाहन जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांनी केले आहे.
या

         
येथे क्लिक करून करा नोंदणी

येथे क्लिक करून करा दुरुस्ती

 

लिंकचा वापर करून नागरिकांनी भारत निवडणूक आयोगाद्वारे तयार केलेले वोटर हेल्पलाइन (Voter helpline) ॲप डाऊनलोड करावे. कोणत्याही शासकीय कार्यालयात न जाता ॲपच्या मदतीने घर बसल्या मतदार यादीत नाव समाविष्ट करू शकतात अथवा अस्तित्वात असलेल्या नाव, फोटो इत्यादीत काही दुरुस्ती असल्यास दुरुस्तीही करू शकतात व मयत मतदाराचे नावे नातेवाईक वगळणी देखील करू शकतात. मोफत व घरपोच मतदान ओळखपत्र EPIC मिळवता येते. तरी नवमतदार, नागरिकांनी या सुविधेचा लाभ घ्यावा असे आवाहन जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांनी केले आहे.

राज्यातील सर्व जिल्हा परिषद अंतर्गत गट ‘क’ संवर्गातील १९ हजार ४६० पदांची मेगाभरती

खुलताबाद – लोणीच्या सरपंचाचे सरपंच पद रद्द; अवैध जात प्रमाणपत्रावर निवडणूक लढणे भावले

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Trending