एक लाखात एक कोटीचा पाऊस पाडतो म्हणून फसवणारा भोंदूबाबा ताब्यात!
अंधश्रद्धेवर विश्वास ठेवून आजही भूलथापांना बळी पडणाऱ्या भोळ्या भाबड्या लोकांचा फायदा भोंदू उचलतात. याची प्रचिती पिशोर येथील शफियाबादच्या एका तरुणास आली. एक लाखात एक कोटीचा पाऊस पाडणार, अशी बतावणी करून एका भोंदूबाबाने पूजेसाठी ठेवलेले तीन लाख रुपये घेऊन ९ मे रोजी पोबारा केला होता. याप्रकरणी एका भामट्यास जळगाव जिल्ह्यातून रविवारी पहाटे पिशोर पोलिसांनी अटक केली. दिलावर गुलाब पिंजारी (रा.देवगाव, ता.पारोळा, जि.जळगाव) असे या भामट्याचे नाव आहे.
साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ थेट कर्ज योजना; इच्छुकांना अर्ज करण्याचे आवाहन
राज्यातील सर्व जिल्हा परिषद अंतर्गत गट ‘क’ संवर्गातील १९ हजार ४६० पदांची मेगाभरती
शफियाबाद येथील बाबासाहेब दिलीप मोकासे या तरुणास जळगाव जिल्ह्यातील एका भोंदूबाबाने जाळ्यात अडकवले. एक लाखात एक कोटी रुपयांचा पाऊस पाडणार, अशी बतावणी करून ९ मे रोजी घरात पूजा करण्यास सांगितले. यानुसार त्याने स्वतःच्या घरात पूजा मांडून पूजेवर तीन लाख ११ हजार रुपये ठेवले. यानंतर भामट्याने चार तास पूजा करून मंत्र पठण केले. नंतर नाशिक येथून काही वस्तू आणायच्या असल्याचे सांगून तुम्ही सोबत चला, असे म्हणत पूजेवर ठेवलेले तीन लाख ११ हजार रुपये घेऊन नाशिकला पळून गेला होता.
बीजभांडवल कर्ज योजनेचे अर्ज सादर करण्याचे आवाहन- औरंगाबाद विकास महामंडळ
ऑनलाईन मतदार यादीत नाव नोंदणी व दुरुस्ती सुरू; येथे क्लिक करून करा नोंदणी- जिल्हाधिकारी