September 21, 2024

सुलतानपूर/भांडेगाव ग्रुप ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी रामलाल जगन्नाथ निंभोरे यांची निवड

0
Contact News Publisher

सुलतानपूर:- खुलताबाद तालुक्यातील ग्रुप ग्रामपंचायत सुलतानपूर /भांडेगाव येथील उपसरपंचपदी रामलाल जगन्नाथ निंभोरे यांची निवड झाली 2021 मध्ये घेण्यात आलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत सुलतानपुर/भांडेगाव ग्रामपंचायतीत काँग्रेस पुरस्कृत पॅनलने 11 पैकी 11 जागांवर विजय मिळवला होता . त्यामुळे 8 फेब्रुवारी 2021 रोजी सरपंचपदासाठी अमरनाथ जगन्नाथ श्रीखंडे, तर उपसरपंचपदासाठी सौ शहनाजबी आसिफ शेख यांची निवड करण्यात आली होती . सौ शहनाजबी आसिफ शेख यांनी ठरल्याप्रमाणे दोन वर्षात राजीनामा दिल्याने या ठिकाणचे उपसरपंचपद रिक्त होते . त्या रिक्त पदासाठी 18 शुक्रवारी 2023रोजी दोन वाजता निवड प्रक्रिया घेण्यात आली . त्यामध्ये रामलाल जगन्नाथ निंभोरे यांनी उपसरपंच पदासाठी नामनिर्देशन अर्ज दाखल केले होते. एकाच नामनिर्देशन दाखल केल्याने रामलाल जगन्नाथ निंभोरे यांना निवडणूक अधिकारी नी विजयी घोषित करण्यात आले . यावेळी खुलताबाद तालुका काँग्रेस कमिटीचे तालुकाध्यक्ष श्री अनिल पाटील श्रीखंडे व औरंगाबाद ओ.बि सी सेल चे सरचिटणीस संजय मोरे यांनी रामलाल जगन्नाथ निंभोरे यांना हार, शाल, श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला .

औरंगाबाद जिल्हा काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस किरण पाटील डोणगावकर,सुलतानपूर येथील विविध कार्यकारी सहकारी संस्था चे माजी चेअरमन श्री संजय श्रीखंडे, शालेय शिक्षण समिती चे अध्यक्ष शाकेर शहा, आसिफ शेख,शालेय शिक्षण समिती चे उपाध्यक्ष सौ अश्विनी चव्हाण, सरपंच अमरनाथ जगन्नाथ श्रीखंडे व जगन्नाथ चव्हाण,सुदाम सोनवणे, पत्रकार हाबीब शेख, ग्रामपंचायत सदस्य शांताबाई मोरे,शहनाजबी शेख, रिपब्लिकन पक्षाचे नेते गौतम जाधव, पत्रकार प्रकाश श्रीखंडे, महंमद शेख, योगेश महालकर, बाळासाहेब शेकनाथ श्रीखंडे,राजु श्रीखंडे, भगवान चव्हाण, खलील मौलाना, पत्रकार हाबीब शेख,मिनाबाई चव्हाण,लंकाबाई चव्हाण, संजय मोरे, रूख्मणबाई प्रकाश चव्हाण तंटामुक्ती अध्यक्ष अंबादास चव्हाण,यांनी त्यांचा सत्कार केला .

निवडणूक प्रक्रिया चे काम‌ निवडणूक निर्णय अधिकारी मंडळ अधिकारी.किशोर वाघ, , सहाय्यक निवडणूक अधिकारी तलाठी दत्तू शेलार आप्पा , ग्रामविस्तार अधिकारी रामराव सोनवणे, पोलिस पाटील तेजराव चव्हाण यांनी पार पाडली.
तर यावेळी आप्पासाहेब चव्हाण, , भगवान जाधव, माजी उपसरपंच बिस्मिल्ला शेख ,गणी सय्यद,सोमनाथ चव्हाण,तातेराव कोतकर, बाबासाहेब मालोदे बाबामियॉ, महंमद शेख , रियाज शेख, उपस्थित होते.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Trending