September 21, 2024

डॉ.मझहर खान’च्या एन्ट्री’ने गंगापूर-खुलताबादचा राजकीय वातावरण तापणार; खासदार इम्तियाज जलील यांची घेतली भेट

0
Contact News Publisher

इच्छुकांनी गंगापूर – खुलताबाद विधानसभा मतदार संघात विधानसभा निवडणुकीची जय्यत तयारी सुरू केली असून दुसरीकडे खुलताबाद येथील कोहीनूर शिक्षण संस्थेचे अध्यक्ष ॲड. डॉ मझहरखान यांनी एम आय एम खासदार इम्तियाज जलील यांची नुकतीच भेट घेतली आहे या भेटीची खुलताबाद व गंगापूर तालुक्यात चांगलीच चर्चा रंगली आहे
ॲड. डॉ. मझहरखान हे खासदार इम्तियाज जलील व संत मंहत यांच्या गाठीभेटी घेत असल्याने मझहरखान हे गंगापूर खुलताबाद विधानसभा निवडणुक लढवणार जवळपास हे निश्चित झाले आहे

गंगापूर-खुलताबाद विधानसभा २०२४; इच्छुकांच्या गर्दीत डॉ.मझर खान यांची एन्ट्री..

ऑनलाईन मतदार यादीत नाव नोंदणी व दुरुस्ती सुरू; येथे क्लिक करून करा नोंदणी- जिल्हाधिकारी

केंद्र व राज्य शासनाच्या वतीने पुढील काही महिन्यांत महाराष्ट्र राज्यात निवडणुकिची घोषणा होणार आहे
घोषणा होण्यापूर्वी खुलताबाद गंगापूर विधानसभा मतदारसंघात इच्छुक उमेदवारांनी निवडणूक लढविण्याची जय्यत तयारी सुरू केली आहे. खुलताबाद गंगापूर विधानसभा मतदारसंघात आमदार प्रशांत बंब. कोहिनूर शिक्षण संस्था अध्यक्ष ॲड. डॉ. मझहरखान, आमदार सतीश चव्हाण, किरण पाटील डोणगावकर, कृष्णा पाटील डोणगावकर, डॉ ज्ञानेश्वर निळ, विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, संतोष माने यांच्यासह बरेच इच्छुक उमेदवार विधानसभा निवडणुकीच्या मैदानात उतरणार असल्याचे दिसून येत आहे

कृषी विभागात सरळसेवेने विविध पदभरतीसाठी अर्ज करण्यास २२ जुलैपर्यंत मुदत

यात ॲड. डॉ. मझहरखान यांनी खुलताबाद गंगापूर विधानसभा निवडणूक लढविण्याच्या तय्यारीत दिग्गजांच्या गाठीभेटीवर भर दिला आहे डॉ. मझहरखान यांनी एम आय एम खासदार इम्तियाज जलील यांची औरंगाबाद येथे नुकतीच भेट घेतली असून डॉ मझहरखान व इम्तियाज जलील यांच्यात काही काळ चर्चा झाली आहे. चर्चा मात्र कोणत्या विषयावर झाली हे रहस्य आहे डॉ मझहरखान व इम्तियाज जलील यांच्या भेटीने खुलताबाद गंगापूर मतदार संघात चांगलेच वातावरण ढवळून निघाले आहे.

गंगापूर-खुलताबाद मतदारसंघातील आकडेवारी’वर चर्चा

खासदार इम्तियाज जलील व डॉ. मजहर खान यांच्यामध्ये तब्बल दोन तास चर्चा झाली आहे यामध्ये गंगापूर-खुलताबाद मतदारसंघाचा राजकीय इतिहास व दोन्ही तालुक्यातील लोकसंख्या व विधानसभा-लोकसभा निवडणुकीत झालेल्या मतांची आकडेवारी व यासर्व विषयावर चर्चा झाल्याची माहिती खात्रीलायक सूत्रांनी दिली आहे.

राज्यातील सर्व जिल्हा परिषद अंतर्गत गट ‘क’ संवर्गातील १९ हजार ४६० पदांची मेगाभरती

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Trending