September 21, 2024

वेरूळ येथे प्रवाशांनी भरलेली रिक्षा पलटी!; रोड वर आलेल्या मुलीला वाचवण्याच्या नादात अपघात

0
Contact News Publisher
  • क्राईम टाईम्स ब्युरो
  • सतीश लोखंडे

औरंगाबाद हुन वेरूळ लेणी येथे पर्यटनासाठी आलेली रिक्षा ही रस्त्यावर एक मुलगी अचानक रस्त्यावर आल्याने तिला वाचविण्याच्या नादात प्रवाशांनी भरलेली रिक्षा पलटी होऊन अपघात झाला. यात असलेल्या दोन प्रवाशांना हाताला व पायाला घसडे बसले असल्याने त्यांना तात्काळ वेरूळ खुलताबाद ग्रामीण रुग्णालय येथे उपचारासाठी पाठवण्यात आले.

याबाबत अधिक माहिती अशी की औरंगाबाद येथून खाजगी रिक्षा क्रमांक MH 20 EF 7289 ही रिक्षाचालक शेख रईस शेख रफिक ( वय ४२) रा. औरंगाबाद हे वेरूळ येथील लेणी बघण्यासाठी पर्यटक अभिषेक तिवारी (वय ३२) व त्यांचे वडील रामचंद तिवारी (वय ६२) दोघे रा. बनारस उत्तरप्रदेश यांना घेऊन आली होती. त्यातीलच वेरूळ लेणी समोर असलेल्या पार्किंग मधून एक पर्यटक मुलगी रस्त्यावर अचानक आडवी आल्याने रिक्षाचालक शेख रफिक यांनी सदरील मुलीला वाचविण्याच्या नादात रिक्षा फिरवल्याने ही रिक्षा एकाएकी पलटी होऊन अपघात झाला. यात रिक्षातील प्रवाशांना व चालकाच्या हाताला व पायाला जोरदार घसरडे बसून मार लागला. तसेच सदरील रिक्षा ही स्थानिकांनी तात्काळ सरळ उभी करून प्रवाशांना सुखरूप बाहेर काढले व रिक्षा रस्त्याच्या कडेला उभी केली. पर्यटकांना उपचारासाठी सामाजिक कार्यकर्ते शेख मासियोद्दीन सौदागर यांनी नेले.

 

(चौकट:- वेरूळ लेणी समोर अपघात हे कायम होतच असतात सार्वजनिक बांधकाम विभागाने या ठिकाणी पर्यटकांची वर्दळ लक्षात घेता गतिरोधक उभारणे गरजेचे आहे.
तसेच घृष्णेश्वर मंदिर जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आणि भोसले चौकात देखील गतिरोधक उभारणी गरजेचे आहे )

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Trending