September 21, 2024

लसणाने भरलेला मालट्रक चोरीची केली बतावणी; फिर्यादीच आरोपी

0
Contact News Publisher

नऊ लाख रुपये किमतीच्या लसणाने भरलेला आयशर मालट्रक चोरल्याची बतावणी करणाऱ्या चालक, वाहकासह सहा आरोपींना अजिंठा पोलिसांनी सहा तासांत अटक केल्याची घटना घडली. यात ९ लाखांच्या लसणासह दोन आयशर, स्विफ्ट कार असा एकूण 40 लाखांचा मुद्देमाल जप्त करून सहा आरोपींना गजाआड करण्यात आले.

मध्य प्रदेशातील इंदूर येथून कर्नाटक येथे ट्रान्सपोर्टद्वारे एका व्यापाऱ्याचा ९ लाख रुपये किमतीचा १० टन लसण भरून जात असताना अजिंठानजीक असलेल्या बाळापूर येथे चोरट्यांनी लसण भरलेला आयशर चोरट्यांनी लंपास केल्याची बतावणी करून अजिंठा पोलिस ठाणे गाठले होते. मात्र, अजिंठा पोलिसांना त्याच्यावरच संशय आल्याने त्यांनी कसून तपास केला. अवघ्या सहा तासांत चालक-वाहकासाह कटात सहभागी असलेल्या सहा आरोपींना गजाआड करून त्यांच्या ताब्यातून चोरलेल्या लासणासह गुन्ह्यात वापरलेले दोन्ही आयशर व एक स्विफ्ट कार असा एकूण सुमारे ४० लाखांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे.

इंदूर येथील व्यापारी सुरेंद्र साधवानी यांनी कर्नाटकात पाठवण्यासाठी सुमारे ९ लाख रुपये किमतीचा १० टन लसूण एका ट्रान्सपोर्टद्वारे (एमएच १८ बीजी ८४६५) या आयशरमध्ये भरून पाठवला होता. संभाजीनगर, जळगाव महामार्गावरील अजिंठानजीक असलेल्या बाळापूर येथे २४ रोजी पहाटेच्या सुमारास चोरट्यांनी तो लंपास केल्याचे चालकाने अजिंठा पोलिस ठाण्यात येऊन सांगितल

https://chat.whatsapp.com/E3O5iShgjVyCRCBDDZ7wbW

पोलिसांना मात्र त्यांच्यावर संशय आल्याने त्यांचा कसून तपास केला असता त्यांनीच चोरीची बतावणी केल्याचे समजताच अजिंठा पोलिस ठाण्याचे सपोनि प्रमोद भिंगारे यांनी पोलिस उपनिरीक्षक गणेश काळे, अक्रम पठाण, संदीप कोथलकर, सांडू जाधव, भागवत शेळके, विकास लोखंडे, संजय कोळी यांच्या पथकाने कसून तपास सुरू केला. याप्रकरणी मध्य प्रदेशातील खरगोन जिल्ह्यातील भोलूखान अजित खान, जितेंद्र चिंतामण गोलकर, सद्दाम खान रशीद खान, शाहरुख रशीद खान, घनश्याम सोनी, रिजवान खान या सहा आरोपींना गजाआड केले आहे.

एक लाखात एक कोटीचा पाऊस पाडतो म्हणून फसवणारा भोंदूबाबा ताब्यात!

पोस्टात भरती!! नवी मुंबई कार्यक्षेत्रातील ग्रामीण डाक सेवक पदासाठी, आज’शेवटचा’दिवस; अर्ज करण्याचे आवाहन

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Trending