September 21, 2024

स्वत:च्याच पत्नीचे अश्लील फोटो केले व्हायरल; बदनामी करणाऱ्या नराधम पतीविरोधात गुन्हा दाखल

0
Contact News Publisher

कौटुंबिक वादानंतर पतीने पत्नीसोबतचे अश्लील फोटो नातेवाईकांच्या सोशल मीडियावर पाठवून बदनामी केल्याचा प्रकार घडला असून पत्नीच्या तक्रारीवरून पतीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

या प्रकरणात महिलेने दिलेल्या तक्रारीनुसार, कौटुंबिक कारणावरून पती तरबेज जावेद सय्यद (रा. फुलेनगर, जामा मस्जीद जवळ पंढरपूर) सोबत वाद झाल्यानंतर सासर सोडून ती माहेरी आई-वडिलांकडे राहण्यास आली होती. ती माहेरी असताना तिचा पती तबरेज याने तिला फोनवरून धमकी दिली, तुला सोडणार नाही. तुझी समाजात बदनामी करीन. माझ्याकडे तुझे फोटो असून ते नातेवाइकांनाही पाठवीन.

 

 

तरबेज सय्यद या महिलेच्या पतीने त्याच्यासोबत पत्नीचे असलेले जुने आक्षेपाहार्य फोटो वडिलांच्या व्हॉट्सअपवर आणि इतर नातेवाईकांच्या व्हॉट्सअपवर पाठविले. त्यामुळे समाजात बदनामी झाली. पत्नीच्या तक्रारीवरून पती तरबेज जावेद सय्यद याच्या विरोधात बेगमपुरा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कृषी सेवक पदभरती साठी ३ ऑक्टोबरपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

 

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Trending