गटशिक्षणाधिकारी प.स.खुलताबाद यांना शिक्षकसेना’कडून’ विविध मागण्यांचे निवेदन
खुलताबाद पंचायत समितीच्या गटशिक्षणाधिकारी यांच्या दालनात आज शिक्षकसेना संघटना कडून शिक्षकांच्या विविध विषयांवर चर्चा करण्यात आली व खालील प्रलंबित मागण्यासाठी निवेदन देण्यात आले आहे.
1 सर्व शिक्षकांना गोपनीय अहवालाची प्रत मिळणे
2 शिक्षकांच्या सेवा पुस्तकेतील प्रलंबित व नव्या सर्व नोंदी घेऊन त्यावर स्वाक्षऱ्या करणे
3) शिक्षकांचे निवड श्रेणी व वरिष्ठ श्रेणी प्रस्ताव विना विलंब जिल्हा परिषद ला सादर करून त्यांचा पाठपुरावा करणे
4) गोपनिय अहवाल जिल्हा परिषदला सादर न करणाऱ्या संबंधित कर्मचाऱ्यावर कारवाई करणे
5) ऑफलाइन सर्व देयके जिल्हा परिषद ला पाठवावे व उर्वरित सर्व देयके मागवून तात्काळ जिल्हा परिषद सादर करणे व त्याची प्रत शिक्षक सेनेस देणे
6) शिक्षकांची ऑनलाईन कामे कमी करण्यासाठी स्वतंत्र व्यवस्था निर्माण करणे
7) शिक्षकांची शाळाबाह्य कामे सर्वेक्षण रद्द करणे
8) BLO साठी सक्ती करण्यात येवू नये
9) केंद्रस्तरावर सेवा पुस्तिकेचा कॅम्प घेऊन सर्व नोंदी पूर्ण करणे. व सर्व नोंदीवर अधिकृतपणे स्वाक्षऱ्या करणे