September 21, 2024

खुलताबाद : जर जरी जरबक्ष दर्गाह’ला विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांची भेट

0
Contact News Publisher

खुलताबाद येथील सुफी संत हजरत ख्वाजा मुन्तजीबोद्दीन जरजरी जरबक्ष रहे यांचे ७३७ व्वा उर्स निमित्ताने त्या बरोबर मोहम्मद पैगंबर यांच्या जन्म दिन ईद-मिलादुन्नबी उत्साहात व शांततेत पार पडली .
विरोधीपक्षनेते अंबादास दानवे यांनी शुक्रवारी जर जरी जर बक्ष रहे दर्गाह भेट घेऊन चादर चढवली .

यावेळी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी सांगितले मोहम्मद पैगंबर व सुफी संत यांनी जगाला भाईचारा व शांततेचा संदेश दिला असुन तो संदेश देशाला अत्यंत गरजेचा आहे व प्रेषित मुहम्मद स.ल.ह ने सद्भावना प्रेम ऐकतेचा संदेश दिला .हा संदेश १४शे वर्ष पुर्वी दिलेला संदेश आज ही त्यांची अंमलबजावणी अत्यंत आवश्यक आहे .

यावेळी आ.प्रशांत बंब यांचा दर्गाह हद्दे कला कमेटी अध्यक्ष एजाज अहमद सुलतान व माजी नगराध्यक्ष ॲड कैसरोद्दीन ,हबीब टेलर यांनी दस्तारबंदी करून शाल देऊन सत्कार केला तसेच तहसीलदार स्वरूप कंकाळ , नगराध्यक्ष ॲड एस एम कमर शरीफ देशमुख मुंबई ,बाबासाहेब बारगळ ,राजु वरकड ,मनोहर लाळे ,गोरख बारगळ ,विष्णू फुलारे ,मुकेश मालोदे ,पांडुरंग काळे ,मोहम्मद युसूफ ,गुफरान शेख ,अमिन मुजावर ,अहेमद मुजावर आदी उपस्थित होते

 

खुलताबाद- जर जरी जर बक्षच्या ७३७व्या उर्सची संदल मिरवणुकीने सुरुवात

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Trending