September 21, 2024

डोक्यात हातोडी घालून मेहुण्याचा खून; खुलताबाद तालुक्यातील घटना

0
Contact News Publisher

खुलताबाद दारूच्या नशेत किरकोळ घरगुती कारणावरून झालेल्या भांडणात साल्याने मेहुण्याच्या डोक्यात हातोडी घालून खून केला. ही घटना सोमवारी रात्री गल्लेबोरगाव शिवारातील घुनावत वस्ती येथे घडली. शांतीलाल छन्नूसिंग कहाटे वय ३४, रा. निरगुडी असे मयताचे नाव आहे, तर संदेश प्रतापसिंग चरवांडे वय २२, असे आरोपीचे नाव आहे.

खुलताबाद पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गल्लेबोरगाव शिवारातील घुनावत वस्ती येथे सोमवारी रात्री ९ वाजेदरम्यान शांतीलाल छन्नूसिंग कहाटे व त्याचा साला संदेश प्रतापसिंग चरवांडे यांच्यात रात्री दारूच्या नशेत घरगुती कारणावरून वाद झाला.

यावेळी संदेश चरवांडे याने रागाच्या भरात घरातील हातोडी आणून शांतीलाल कहाटे यांच्या डोक्यात घातली. यामध्ये शांतीलाल हे क्षणात रक्ताच्या थारोळ्यात पडले. कुटुंबीयांनी त्यांना तात्काळ रुग्णवाहिकेने औरंगाबाद घाटी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. तेथे उपचार सुरू असताना शांतीलाल कहाटे यांची मंगळवारी दुपारी १:३० वाजेच्या सुमारास प्राणज्योत मालवली.

आरोपीला अटक

याप्रकरणी मयताचा भाऊ अंबरसिंग छन्नूसिंग कहाटे (रा. निरगुडी) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी संदेश चरवांडेविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी आरोपीला अटक केली असून, याप्रकरणी अधिक तपास पोलीस निरीक्षक भुजग हातमोडे यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि. अमोल ढाकणे हे करीत आहेत.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Trending