रेशनकार्ड आहेत मग् राज्यात कोणत्याही रेशन दुकानातून मिळवा रेशन-“एक देश एक शिधापत्रिका”
एक देश एक शिधापत्रिका (ONORC) योजना पासून 1 जानेवारी 2020 राज्यात लागू करण्यात आली आहे.
केंद्र शासनाच्या या योजनेतंर्गत संबंधित रास्तभाव दुकानात आधार Authentication करुन लाभार्थ्याला पोर्टेबिजिटीद्वारे कोणत्याही राज्यातील कोणत्याही रास्तभाव दुकानातुन धान्य उचलण्याची सोय उपलब्ध आहे.
राज्यातील रास्तभाव दुकानातून स्थलांतरित कामगार, ऊसतोड मजूर, आदिवासी ई. स्थलांतरण करणाऱ्या लाभर्थ्यांना त्यांच्या स्थलातंरणाऱ्या ठिकाणी कोणत्याही रास्तभाव भाव दुकानात अनुज्ञेय असलेले धान्य घेण्याची सुविधा पोर्टेबिलीटीद्वारे ई-पॉस उपकरणांवर उपलब्ध करुन देण्यात आली आहे.
100 टक्के अनुदानित योजना: गटई कामगार योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन; येथे ऑनलाईन अर्ज करा
अन्न सुरक्षा कायद्याचे सर्व लाभार्थी,विशेषत: स्थलांतरीत, कामगार त्यांच्या सध्या राहत असलेल्या ठिकाणी धान्या उपलब्ध होणार आहे. लाभार्थी- अन्न सुरक्षेबाबत देशाच्या कोणत्याही भागात स्वावलंबी व्हावेत, हा “एक देश एक शिधापत्रिका” योजनेचा हेतु आहे. योजनेच्या प्रभावी अंमलबजावणी साठी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात वास्तव्यास असलेल्या व शिधापत्रिका असलेल्या इतर राज्यातील नागरिकांना वास्तव्याजवळील रास्त भाव दुकानात बायोमेट्रिक प्रणालीद्वारे धान्य प्राप्त करुन घ्यावे.
लाभर्थ्यांनी निकषानुसार सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत धान्याचा लाभ घ्यावा, तसेच या योजनेतंर्गत कोणतीही अडचण असल्यास संबधित तालुक्यातील तहसील कार्यालयातील पुरवठा शाखेत अथवा जिल्हा पुरवठा अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधवा. असे आवाहन जिल्हा पुरवठा अधिकारी वर्षाराणी भोसले यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे.
स्वस्त धान्य दुकान परवाना मिळण्यासाठी अर्ज करण्याचे आवाहन