शालेय मूलभूत सुविधेसाठी समाजाचा सहभाग; गावांतील दानशूर पालकांचा पुढाकार
काल दि .12/12/2023रोजी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गोळेगाव येथे गोळेगावातील दानशूर व्यक्तींनी शालेय मूलभूत गरजांबाबत शालेय मुख्याध्यापक व शिक्षकांशी चर्चा करून शाळेसाठी लागणाऱ्या आवश्यक त्या मूलभूत गरजांची पूर्तता आज गोळेगावातील 26 आदर्श दानशूर नागरिकांनी केली . हा कार्यक्रम गोळेगाव येथील माजी उपसरपंच तथा तंटामुक्ती अध्यक्ष शाळा व्यवस्थापन समिती शिक्षण प्रेमी सदस्य आदरणीय सन्माननीय श्रीमान . दिलीपजी औटे यांनी घडवून आणला . कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान श्री दिलीपजी औटे यांनी स्वीकारले अध्यक्ष व उपस्थित सन्माननीय प्रमुख पाहुणे व मार्गदर्शक यांच्या हस्ते सरस्वती पूजन करण्यात आले .
सुरुवातीस शालेय शिक्षक श्री . प्रवीण देशमुख यांना लाडशाखीय वाणी समाजाने राज्यस्तरीय समाजभूषण पुरस्काराने गौरविल्याबाबत गोळेगावकर गावकऱ्यांनी देखील त्यांचा पुष्पगुच्छ शाल श्रीफळ देऊन सत्कार केला .
गोळेगाव शाळेचे मुख्याध्यापक सन्माननीय श्री गाडेकर सर यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केल .
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करीत असताना श्री देशमुख सरांनी दान का करावे, दानाचे पुण्य फळ व दातृत्वाची महाभारतातील श्रीकृष्ण व अर्जुन आणि कर्ण या तिघातील दानशूरते बाबतची कथा उपस्थितांना सांगून कवी विंदा करंदीकरांच्या कवितेच्या ओळी देखील सांगितल्या .
*देणाऱ्याने देत जावे*,
*घेणाऱ्याने घेत जावे*,
*घेता घेता एक दिवस*,
*देणाऱ्याचे हात घ्यावेत*
*विंदा करंदीकर लिखित कवितेची प्रचिती आज वास्तव स्वरूपात गोळेगावात दिसून आली* गोळेगावातील आदर्श नागरिक व 26 दानशूर कर्णांचे मुख्याध्यापक व शालेय शिक्षकांनी शाल व पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले .
दानशूर व्यक्तींची नावे व त्यांनी शाळेसाठी दिलेले साहित्य खालील प्रमाणे
🌹1)श्री. दिलीपजी औटे:-दर्जेदार हात रुमाल 262 नग
🌹2)श्री. सोपान किसन शिंदे:-कुलूप 8 नग
🌹3)श्री. अशोक नामदेव औटे:-झाडांच्या कुंड्या 24 नग
🌹4)श्री. आजिनाथ रखमाजी जाधव(पोलीस पाटील गोळेगाव):-कचराकुंडी 8 नग
🌹5)श्री.कृष्णा जनार्दन पोपळे:- घड्याळ 8 नग
🌹6)श्री. नवनाथ साहेबराव पोकळे:-पेन पेन्सिल इरेझर 262 नग
🌹7) श्री. संतोष सांडू व्यवहारे:-झाडू 6 नग
🌹8)श्री.मुरलीधर कचरू कचवा:-इंग्रजी स्पोकन पुस्तके 48 नग
🌹9)श्री. संतोष भानुदास जिते:- चित्रकला वही 48 नग
🌹10)सिकंदर रज्जाक सय्यद:-दोन डझन वही
🌹11)श्री. राजू पंडितराव औटे:- वही 3 डझन
🌹12)जमीन इब्राहिम बेग:-आय कार्ड 15
🌹13)श्री.राजू मनोहर जोशी:- 262 चमचे
🌹14) श्रीसोमीनाथ नामदेव आढाव:-प्रथमोपचार पेटी 3 नग
🌹15)श्री .सागर अण्णा औटे:- 2फोटो
🌹16)साईनाथ रतन मोरे:-8 खराटे
🌹17) श्री अशोक नामदेव आदमाने:- नेलकटर 12 नग
शाळेसाठी प्रत्येकी एक नग लोखंडी रॅक देणारे व्यक्ती
🌹18)अर्चना सुभाष जीते:-वृक्ष संवर्धन जाळी 11 नग
*शाळेसाठी प्रत्येकी एक नग लोखंडी रॅक देणारे व्यक्ती
खालील प्रमाणे*:-
🌹19)बबन कडूबा बोडके
🌹20)बन्सी कचरू कच्छवा
🌹21)प्रकाश लक्ष्मण जाधव
🌹22)गणेश भास्कर कऱ्हाळे
🌹23)दिनकर नारायण तिळवणे
🌹24)अशोक रामभाऊ गोल्हार
🌹25)शिवाजी कारभारी औटे
🌹26)बाबासाहेब जयवंता औटे
नागरिकांमध्ये आपल्या शाळेबद्दल आपुलकी व स्नेह निर्माण व्हावा तसेच या मूलभूत गरजेच्या पूर्ततातून शाळा शोभिवंत सुंदर व शालेय गुणवत्ता विकासास प्रेरणा मिळावी व समाजात देखील आपण दुसऱ्याचे देणे लागतो ही प्रेरणा निर्माण व्हावी हे उद्दिष्ट ठेवून श्रीमान दिलीपजी औटे यांनी आपल्या सहवासातील समाजहितवादी नागरिकांशी चर्चा करून हा कार्यक्रम घडवून आणला .कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन श्री काटकर सर यांनी केले .
या कार्यक्रमात सहभागी व उपस्थित गोळेगावातील विविध पदांवरील सर्व सन्माननीय नागरिकांचे खूप खूप धन्यवाद
वरील कार्यक्रम यशस्वीतेसाठी श्रीमती भागवत मॅडम, रोकडेवाड मॅडम ,मोहिते मॅडम, झेंडे मॅडम यांनी सहकार्य केले