December 4, 2024

खुशखबर ! गुगल पे, फोन पे, पेटीएम आता 45 दिवसांसाठी देणार उसने पैसे, व्याज पण लागणार नाही, किती पैसे मिळणार, वाचा सविस्तर

0
Contact News Publisher

Google Pay, Phone Pay, Paytm : भारतात अलीकडे रोकड व्यवहार करण्याऐवजी कॅशलेस व्यवहार करण्याला विशेष पसंती दाखवली जात आहे. आता यूपीआयच्या माध्यमातून कोणत्याही व्यक्तीला ऑनलाईन पद्धतीने सहजतेने पैसे पाठवता येत आहेत. यासाठी बाजारात अनेक डिजिटल पेमेंट एप्लीकेशन आल्या आहेत.

यामध्ये गुगल पे, फोन पे, पेटीएम यांसारख्या एप्लीकेशनचा समावेश होतो. विशेष म्हणजे या डिजिटल पेमेंट एप्लीकेशन चा वापर दिवसागणिक वाढतच लागते. जर तुम्हीही डिजिटल पेमेंट एप्लीकेशनचा उपयोग करत असाल तर तुमच्यासाठी एक अतिशय महत्त्वाची आणि मोठी अपडेट समोर आली आहे. खरे तर नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशनच्या माध्यमातून यूपीआय पेमेंटच्या अनेक नियमांमध्ये बदल केले आहेत.

 

हे बदललेले नियम एक जानेवारी 2024 पासून लागू होणार आहेत. दरम्यान आज आपण नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशनने यूपीआय पेमेंट संदर्भात बदललेले पाच नियम थोडक्यात जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. चला तर मग वेळ न दवडता जाणून घेऊया याविषयी सविस्तर माहिती.

 

पहिला नियम कोणता : तुम्ही Google Pay, PhonePe, Paytm, BHIM किंवा इतर UPI द्वारे नवीन नंबरवर रु. 2000 पेक्षा जास्त पेमेंट केले तर पहिले पेमेंट हे चार तासांनंतर पूर्ण होणार आहे. या चार तासांमध्ये पेमेंट करणाऱ्या व्यक्तीला पेमेंट थांबवता येणार आहे आणि रक्कमही बदलता येणार आहे.

 

दुसरा नियम कोणता : आता कोणत्याही UPI द्वारे एका दिवसात 5 लाख रुपयांपर्यंत पैसे ट्रान्सफर करता येणार आहेत. पूर्वी ही रक्कम फक्त एक लाख रुपये एवढी होती. मात्र ही सेवा केवळ शैक्षणिक संस्था आणि रुग्णालयांसाठी लागू करण्यात आली आहे. ही सुविधा इतर कोणालाही उपलब्ध राहणार नाही.

 

तिसरा नियम कोणता : NPCI ने 1 जानेवारी 2024 पासून दैनंदिन वापराच्या रकमेतही वाढ केली आहे. आता 1 लाख रुपयांपर्यंतचे दैनिक पेमेंट 24 तासांत करता येणार आहे.

 

चौथा नियम कोणता : यूपीआयद्वारे एसआयपी, विमा प्रीमियम आणि इतर बँकिंग पेमेंट करण्याची मर्यादा वाढवण्यात आली आहे. आधी ही मर्यादा 15,000 रुपये एवढी होती. आता मात्र याची मर्यादा एक लाख रुपयांपर्यंत करण्यात आली आहे. यामुळे यूपीआय वापरणाऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.

 

पाचवा नियम कोणता : पाचवा आणि सर्वात महत्त्वाचा नियम म्हणजे आता तुमच्या खात्यात पैसे नसले तरीही, UPI Now द्वारे मर्यादित रकमेपर्यंत पेमेंट करता येणार आहे. ही रक्कम तुम्हाला ४५ दिवसांसाठी व्याजाशिवाय उपलब्ध होणार आहे. या UPI Now चा सर्वसामान्यांना मोठा दिलासा मिळणार असून यामुळे त्यांना खर्चासाठी विना व्याजाचे पैसे उपलब्ध होणार आहेत.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Trending