वारसफेर हक्कसोड नोंदणी प्रक्रिया | वारसफेर किंवा हक्कसोड कसा करावा?
वारसफेर हक्कसोड नोंदणी : शेतकरी बांधवांसाठी शेती हा महत्वाचा विषय आहे त्यामुळे शेतीची वारसनोंद कशी केली जाते या संदर्भातील सविस्तर माहिती
उदाहरणार्थ—
तुमच्या आईच्या किंवा वडिलांच्या नावे जमीन असेल आणि ज्यांच्या नावे जमीन असेल त्यांचा मृत्यू झाला असेल तर अशावेळी सदरील जमीन नावे करण्यासाठी दुय्यम निबंधक अर्थात रजिस्ट्री (कार्यलय )ऑफिसमध्ये अनेक वेळा हेलपाटे खावे लागते.
वडिलांचे किंवा आईच्या नावे जमीन असेल आणि वारसहक्काने तुम्हाला ती जमीन तुमच्या नावे करायची असेल तर त्यासाठी एक प्रोसेस असती ती तुम्हाला आम्हाला सर्व शेतकरी बांधवाना माहिती असणे गरजेचे आहे.
पुढील माहितीपण वाचा ई हक्क प्रणाली द्वारे केले जाणार ऑनलाईन नऊ प्रकारचे फेरफार
वारस नोंद किंवा हक्क सोड प्रक्रिया
एखाद्या व्यक्तीच्या नावे शेत जमीन असेल आणि त्यांच्या मृत्यू झाला असेल तर त्यानंतर म्हणजेच एक महिन्यानंतर जे वारसदार आहेत त्यांनी रीतसर तलाठी यांच्याकडे अर्ज करणे गरजेचे असते.
दुय्यम निबंधक कार्यालयात जावून रीतसर दस्त नोंदणी करावी लागते या रजिस्ट्री पेपरवरून मग करून तलाठी वारसफेर ज्याला हक्कसोड देखील म्हणतात करतात
बऱ्याच शेतकरी बांधवाना हि हक्कसोड पद्धत किंवा वारसफेर नोंद करण्याच्या पद्धतीची माहिती नसते.
अशावेळी त्यांना अनेकवेळा तलाठी साहेब किंवा दुय्यम निबंधक कार्यालयात चकरा माराव्या लागतात.
घरकुल योजना | नवीन घरकुलांना मंजुरी यादी ; शासन निर्णय पहा
दुय्यम निबाधक कार्यालयात दस्तनोंदणी करण्यासाठी लागणारी कागदपत्रे
रजिस्ट्री कार्यालयात दस्त नोंदणी करण्यासाठी दोन साक्षीदार लागतात, अर्जदार व साक्षीदार यांना खालील प्रकारेचे कागदपत्रे लागतात.
- अर्जदाराचे आधार कार्ड
- 100 रुपयांचा बॉंड पेपर
- संपूर्ण वारसदारांचे आधार कार्डची छायांकित प्रत.
- सातबारा
- वारस प्रमाणपत्र
- जमिनीची चतु:सीमा नकाशा.
वारसफेर संदर्भातील हि प्रोसेस माहित असेल तर ठीक आहे पण जे नवीन आहेत त्यांना तर फार चकरा माराव्या लागतात.
गाय म्हैस अनुदान योजना : गाय 70 म्हशीसाठी 80 हजार अनुदान -येथे करा ऑनलाईन अर्ज
शेतीचा वारसफेर किंवा हक्कसोड कसा करावा?
वारसफेर किंवा हक्कसोड करण्यासाठी तुमच्या तालुक्याच्या ठिकाणी असलेल्या दुय्यम निबंधक कार्यालयात जाणून दस्त नोंदणी करावी लागते. या दस्तनोंदणीच्या आधारे तलाठी सातबाऱ्यावर वारसफेर नोंद घेतात.
स्वस्त धान्य दुकान परवाना मिळण्यासाठी अर्ज करण्याचे आवाहन
वारसफेर किंवा हक्कसोड पत्र करण्यासाठी कोणकोणती कागदपत्रे लागतात?
हक्कसोड पत्र किंवा वारसनोंद करण्यासाठी बरेच कागदपत्रे लागतात त्या संदर्भातील संपूर्ण माहितीची pdf या लेखामध्ये दिलेली आहे. सर्वसाधारणपणे अर्जदार व साक्षीदारांचे आधार कार्ड, जमिनीचा सातबारा, जमिनीची चतु:सीमा व इतर महत्वही कागदपत्रे लागतात.
Bigg Boss 17 | कोण ठरणार ‘बिग बॉस’चा विजेता!; या’ दोन स्पर्धकांमध्ये होणार फिनालेसाठी चुरस!