December 4, 2024

शासकीय योजना -कंबाईन हार्वेस्टार साठी मिळतंय तब्बल 11 लाखांचे अनुदान!| असा करा ऑनलाईन अर्ज…

0
Contact News Publisher

शेतकऱ्यांना परवडणाऱ्या दरात कृषी उपकरणे यंत्रे उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने शासनामार्फत अनेक प्रकारच्या कृषी उपकरण अनुदान योजना राबविण्यात येत आहेत. या योजनांतर्गत शेतकऱ्यांना कृषी उपकरणे खरेदीवर अनुदानाचा लाभ दिला जातो. या योजनांमध्ये कृषी यांत्रिकीकरणावर सब मिशन योजना ही एक योजना राबविण्यात येत आहे. याअंतर्गत शेतकऱ्यांना कंबाईन हार्वेस्टर खरेदीसाठी 11 लाख रुपयांपर्यंतचे अनुदान दिले जात आहे.

मुख्यमंत्री कृषी सिंचन योजना- ठिबकसाठी 1 लाख तर तुषार सिंचनसाठी 25 हजारांपर्यंत अनुदान !; फक्त 2 मिनिटांत असा करा ऑनलाईन अर्ज..

इच्छुक शेतकऱ्यांना या योजनेअंतर्गत अर्ज करून कंबाईन हार्वेस्टरवरासाठी अर्ज करता येणार आहे.

कंबाईन हार्वेस्टर हे शेतकऱ्यांसाठी अतिशय उपयुक्त यंत्र आहे. हे यंत्र ट्रॅक्टरला जोडून चालवता येते. मात्र, आता अँटोमॅटिक कंबाईन हार्वेस्टरही उपलब्ध आहेत. या यंत्राच्या साहाय्याने शेतकरी पीक कापणी, मळणी, गोळा करणे, साफसफाईची कामे एकाच वेळी करू शकतात. कंबाईन हार्वेस्टर्सचा वापर सामान्यत: गहू, बार्ली, मका आणि सोयाबीन यांसारख्या पिकांसाठी केला जातो.

वारसफेर हक्कसोड नोंदणी प्रक्रिया | वारसफेर किंवा हक्कसोड कसा करावा?

कंबाईन हार्वेस्टरवर शासनाकडून किती दिलं जातं अनुदान..

सब मिशन ऑन ॲग्रिकल्चरल मेकॅनायझेशन SMAM योजनेंतर्गत 6 फूट कटर बार रुंदी असलेल्या कंबाईन हार्वेस्टरवर सबसिडीचा लाभ दिला जात आहे. या अंतर्गत अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, लहान व मजूर शेतकरी आणि महिलांना कंबाईन हार्वेस्टर खरेदीवर 50 टक्के किंवा कमाल 11 लाख रुपये अनुदान दिले जाते. तर सर्वसाधारण प्रवर्गासह इतर प्रवर्गातील शेतकऱ्यांना 40 टक्के अनुदान दिले जाते ते 8.80 लाख रुपयांपर्यंत आहे. त्यासाठी तुम्ही खाली दिलेला तक्ता पाहू शकता.

जमीन : कुळ म्हणजे काय! कुळाचे प्रकार किती व कोणते..

कंबाईन हार्वेस्टरची किंमत किती असते ?

महिंद्रा, प्रीत, करतार, दशमेश, न्यू हॉलंड, कुबोटा आदी कंपन्यांचे उत्तम हार्वेस्टर बाजारात उपलब्ध आहेत. परंतु तुम्हाला तुमच्या जिल्ह्याच्या कृषी विभागाने नोंदणी केलेल्या डीलरकडूनच हार्वेस्टर खरेदी करावा लागणार आहे. कारण त्याचे कोटेशन अन् टेस्टिंग रिपोर्टचे कागदपत्रे आवश्यक आहे, तरच तुम्हाला अनुदानाचा लाभ मिळू शकेल.
अशा परिस्थितीत, तुम्हाला विभागाने नोंदणी केलेल्या डीलरकडूनच कंबाईन हार्वेस्टर खरेदी करावे लागेल. कंबाईन हार्वेस्टरची अंदाजे किंमत 5.35 लाख ते 26.70 लाख रुपये आहे. कृषी यंत्राच्या किमतीवर शेतकऱ्यांना अनुदानाचा लाभ दिला जातो..

घरकुल योजना | नवीन घरकुलांना मंजुरी यादी ; शासन निर्णय पहा

योजनेचा लाभ घेण्यासाठी लागणारे कागदपत्रे

आवश्यक कागदपत्रे..

अर्ज करणाऱ्या शेतकऱ्याचे आधार कार्ड,
पॅनकार्ड,
रहिवासी प्रमाणपत्र,
उत्पन्न प्रमाणपत्र
शेतजमिनीची कागदपत्रे 7/12 – 8 अ
बँक पासबुकची प्रत
मोबाईल नंबर जो आधारशी लिंक..
शेतकऱ्याचा पासपोर्ट आकाराचा फोटो इ..

गाय म्हैस अनुदान योजना : गाय 70 म्हशीसाठी 80 हजार अनुदान -येथे करा ऑनलाईन अर्ज

अर्ज कसा कराल ?

शेतकरी मित्रांनो, कृषी यांत्रिकीकरण SSAM योजनेवरील उप – अभियान या योजनेकरिता तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता असून त्यासाठी आपल्या राज्यशासनाच्या mahadbt या महा – डीबीटी पोर्टलवर अर्ज करावा लागणार आहे.

Aadhaar कार्ड’ला Mobile Link Online आधार ‘कार्ड’ला मोबाईल नंबर 2 मिनिटांत असा लिंक करा 

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Trending