नशेच्या गोळ्या विकणाऱ्यास पकडले, शेकडो गोळ्या जप्त; सिटीचौक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
औरंगाबाद शहरातील बारुदगर नाला येथे नशेच्या गोळ्या विक्री करणाऱ्या शेख मजीद शेख गफूर (20) याला सिटीचौक पोलीसांनी गुरुवारी अटक केली आहे. त्याच्या ताब्यातून 30 हजार रुपये किमतीच्या एकूण 370 गोळ्या जप्त केल्या आहेत.
वारसफेर हक्कसोड नोंदणी प्रक्रिया | वारसफेर किंवा हक्कसोड कसा करावा?
शासकीय योजना -कंबाईन हार्वेस्टार साठी मिळतंय तब्बल 11 लाखांचे अनुदान!| असा करा ऑनलाईन अर्ज…
शेख मजीद हा बारुदगरनाला येथे गोळ्या विक्री करण्यासाठी येणार असल्याची माहिती पोलीस निरीक्षक निर्मला परदेशी यांना मिळाली होती. त्यावरून पंच, वैज्ञानिक तज्ज्ञ यांना घेऊन उपनिरीक्षक प्रशांत मुंडे, अर्जुन कदम यांच्या पथकाने सापळा रचून त्याला ताब्यात घेतले. त्याची अंगझडती घेतली असता, त्याच्याकडे निट्रोसून- 10 नावाच्या एकूण 370 गोळ्या सापडल्या. तो रिक्षाचालक असून, नशेच्या गोळ्या विक्रीचा त्याचा साइड धंदा असल्याची माहिती पोलीसांनी दिली. याप्रकरणी सिटीचौक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मोठी घोषणा! राज्य सरकार देणार गाईच्या दुधाला ५ रुपये प्रति लिटर अनुदान; असा करा ऑनलाईन अर्ज…
ही कारवाई औषध निरीक्षक व्ही.डी. मरेवाड, यांच्यासह पोलीस हवालदार मुनीर पठाण, अंमलदार इप्पर, त्रिभुवन, टेकले, सोहेल पठाण, वाहूळ आदींनी केली.
PM किसान -8 कोटी शेतकऱ्यांसाठी चांगली बातमी मिळाली, 16 व्या हप्त्यावर मोठी खबर..