September 21, 2024

सतत पोटदुखी अन् डॉक्टरांनी तपासताच भयंकर दिसलं; महिलेच्या पोटातून काढला किलोभराचा गोळा..

0
Contact News Publisher

औरंगाबाद शहर परिसरातील २६ वर्षीय महिलेच्या पोटातून साधारणपणे एक किलोग्राम वजनाचा गोळा काढण्याची यशस्वी शस्त्रक्रिया चिकलठाणा परिसरातील जिल्हा सामान्य रुग्णालयात करण्यात आली. काहीशा क्लिष्ट शस्त्रक्रियेनंतर संबंधित महिला रुग्णाला दिलासा मिळाला आहे.

वारसफेर हक्कसोड नोंदणी प्रक्रिया | वारसफेर किंवा हक्कसोड कसा करावा?

या महिलेला किमान आठवड्यापासून सातत्याने पोटदुखीचा त्रास होत होता. तपासणीअंती पोटात गोळा असल्याचे स्पष्ट झाले होते; परंतु खासगी रुग्णालयात शस्त्रक्रियेसाठी लाखभर रुपयांचा खर्च सांगण्यात आल्यानंतर ती महिला जिल्हा रुग्णालयात दाखल झाली होती. रुग्णालयातील स्त्रीरोग विभागाचे प्रमुख डॉ. कमलाकर मुदखेडकर, डॉ. कविता जाधव, भूलतज्ज्ञ डॉ. वैशाली जाधव यांनी गुरुवारी शस्त्रक्रिया करून तिच्या पोटातून एक किलोग्राम वजनाचा गोळा यशस्वीरीत्या काढला.

लसणाने भरलेला मालट्रक चोरीची केली बतावणी; फिर्यादीच आरोपी

दरम्यान, असा गोळा तयार होण्यामागे निश्चित कारण सांगता येत नसले, तरी एवढा मोठा गोळा तयार होण्यासाठी काही महिन्यांचा कालावधी लागू शकतो. अशी शस्त्रक्रिया आव्हानात्मक असतेच शिवाय काही वेळा धोकादायकही ठरू शकते, असेही डॉ. मुदखेडकर म्हणाले. यशस्वी शस्त्रक्रियेबद्दल जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. दयानंद मोतीपवळे, अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. पद्मजा सराफ यांनी शस्त्रक्रिया पथकाचे अभिनंदन केले.

PM किसान योजना | शेतकऱ्यांसाठी खुशखबर! एकाटप्प्यात खात्यात जमा होणार 16 व 17वा हप्ता; हप्त्यातही होणार वाढ…

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Trending

मोठी घोषणा! राज्य सरकार देणार गाईच्या दुधाला ५ रुपये प्रति लिटर अनुदान; असा करा ऑनलाईन अर्ज…