धक्कादायक!! औरंगाबादेत पतीने केली पत्नीची हत्या! हातोडीचे वार करत पत्नीच्या डोक्याचा केला भुगा

0
GridArt_20240208_165028247
Contact News Publisher

कंपनी बंद पडल्यानंतर सुरू झालेल्या आर्थिक अडचणी, कौटूंबिक ताण तणावातून नैराश्यात गेलेल्या पतीने पत्नीची झोपेतच हत्या केली. पत्नी गार झोपेत असताना घरातील छोट्या हाताड्याने त्याने पत्नीच्या डोक्याचा अक्षरक्ष: भुगा केला. लिला कृष्णा नाफडे असे मृत महिलेचे नाव असून कृष्णा निवृत्ती नाफडे (५३) असे क्रुर पतीचे नाव आहे. हत्या केल्यानंतर बुधवारी पहाटे ४.२६ वाजता त्याने मुलासह नातेवाईकांना कॉल करुन स्वत:च्या कृत्याची माहिती दिली.

धक्कादायक!! वनरक्षक परीक्षेवरून परतणाऱ्या ३ सख्या भावंडांचा अपघातात करूण अंत

कृष्णा व्हिडिओकॉन कंपनीत कामाला होता. काही वर्षांपुर्वी कंपनी बंद पडली. पत्नीसह तो म्हाडा कॉलनीतील तोरणागड परिसरात राहत होता. त्याचा लहान मुलगा नाशिकला वैद्यकिय शिक्षण घेतो तर विवाहित मुलगी ठाण्याला पतीसह वास्तव्यास असते. कंपनी बंद पडल्यानंतर कृष्णाच्या वागण्यात बदल होत गेला. मुळ बुलढाणा जिल्ह्यातील असलेला कृष्णाला शेतातून देखील उत्पन्न नव्हते. त्यामुळे तो दिवसेंदिवस अधिक नैराश्यात गेला. तो सातत्याने आत्महत्याच्या गप्पा मारत होता. मंगळवारी त्याने पत्नीसोबत रात्री जेवण केले. मुलांसोबत कॉलवर बोलणे देखील झाले.

मनोज जरांगे प्रामाणिक अन् निष्ठांवत माणूस; खासदार इम्तियाज जलील यांच्याकडून मनोज जरांगेंचे कौतुक

दरम्यान, आज पहाटे गाढ झोपेत असलेल्या पत्नीच्या डोक्यात सेंट्रिंगचे काम करणाऱ्या हातोडीने कृष्णाने वार केले. कपाळाच्या मधोमध छिद्रपाडून उजव्या बाजुने डोके ठेचून काढले. त्यानंतर त्याने नातेवाईकांना कॉल करून कृत्याची माहिती दिली. घटनेची माहिती कळताच मुकूंदवाडी ठाण्याचे निरीक्षक शिवाजी तावरे यांनी सहकाऱ्यांसह धाव घेतली.

भर कार्यक्रमात वरिष्ठ न्यायमूर्तींना हात धरून उठवलं!, चूक लक्षात येताच वृत्तपत्रातून ‘माफीनामा’

कृष्णा घरातच बसलेला होता. लिला यांचा मृतदेह घाटी रुग्णालयात रवाना करुन पोलिसांनी कृष्णाला ताब्यात घेतले. पोलिसांना देखील तो विचित्र उत्तरे देत बडबड करत होता. मुलाच्या तक्रारीवरुन खुनाचा गुन्हा दाखल करुन वडिल कृष्णाला अटक करण्यात आली.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *