December 4, 2024

साईबाबांच्या दर्शनासाठी निघालेल्या भक्तांवर काळाचा घाला; समृद्धीवर अपघातात ३ ठार, २ जखमी

0
Contact News Publisher

साईबाबांच्या दर्शनासाठी समृद्धी महामार्गाने शिर्डीकडे जाणाऱ्या जालना जिल्ह्यातील भाविकांच्या कारचा शुक्रवारी रात्री 9.30 वाजता वैजापूरजवळ भीषण अपघात झाला. यात कारमधील तीन जणांचा मृत्यू झाला तर दोघे जखमी झाले. समृद्धी महामार्गावरील चॅनल क्रमांक 504 जवळ ही दुर्घटना घडली.

वारसफेर हक्कसोड नोंदणी प्रक्रिया | वारसफेर किंवा हक्कसोड कसा करावा?

जाफराबाद तालुक्यातील हलके तपोवन येथील 5 जण कारमधून (एमएच 21/ बीएफ 9248) रात्रीच्या वेळी शिर्डी येथे साई दर्शनाला जात होते. साडेनऊ वाजेच्या सुमारास कारचालकाचे नियंत्रण सुटल्याने त्यांची गाडी कंटेनरवर पाठीमागून धडकली. 9.45 वाजता समृद्धी महामार्गावरील आपत्कालीन क्रमांकावर अपघाताची माहिती कळली. तेथील सुरक्षा यंत्रणा तसेच स्थानिकांनी गंभीर जखमींना वैजापूरच्या उपजिल्हा रुग्णालयात नेले. तेथून दोघांना छत्रपती संभाजीनगरला, तिघांना कोपरगावला हलवण्यात आले होते.

धक्कादायक!! औरंगाबादेत पतीने केली पत्नीची हत्या! हातोडीचे वार करत पत्नीच्या डोक्याचा केला भुगा

उमेश उगले, राहुलराज भोज व भाऊसाहेब पैठणे या तिघांचा मृत्यू झाला. तर महिको कंपनीत देऊळगावराजा येथे कार्यरत रवींद्र मन्सूरराव फलके यांच्यासह अन्य एक प्रवासी जखमी झाल्याची माहिती रुग्णालयातून मिळाली

 

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Trending

मोठी घोषणा! राज्य सरकार देणार गाईच्या दुधाला ५ रुपये प्रति लिटर अनुदान; असा करा ऑनलाईन अर्ज…