प्रधानमंत्री विश्वकर्मा कौशल्य सन्मान योजना; ऑनलाईन अर्ज सुरू | अर्ज करण्याचे जिल्हा प्रशासनाचे आवाहन
महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळामार्फत प्रधानमंत्री विश्वकर्मा कौशल्य सन्मान योजना राबविण्यात येत आहे. या योजनेत पारंपारिक कारागिरांना अर्थसहाय्य, प्रशिक्षण इ.लाभ दिला जातो. त्यासाठी इच्छुक लाभार्थ्यांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले आहे, असे जिल्हा ग्रामोद्योग अधिकारी यांनी कळविले आहे.
सतत पोटदुखी अन् डॉक्टरांनी तपासताच भयंकर दिसलं; महिलेच्या पोटातून काढला किलोभराचा गोळा..
या योजनेमध्ये सहभागी होऊ इच्छिणाऱ्या व व्यवसाय अनुभव असलेल्या पारंपारिक कारागिरांनी उद्योग स्थापन करण्यासाठी ऑनलाईन अर्ज प्रधानमंत्री विश्वकर्मा कौशल्य सन्मान योजना पोर्टलवर जाऊन करावयाचा आहे. यासंदर्भातसर्व सविस्तर माहितीही प्रधानमंत्री विश्वकर्मा कौशल्य सन्मान योजना पोर्टलवर दिली आहे. तसेच खादी ग्रामोद्योग मंडळाचे जिल्हा कार्यालय, सामान्य सेवा केंद्र येथेही माहिती उपलब्ध असून येथूनही ऑनलाईन अर्ज करण्याची सुविधा आहे. अधिक माहितीसाठी मंडळाच्या जिल्हा कार्यालयाशी संपर्क साधावा,असे कळविण्यात आले आहे
शासकीय योजना -कंबाईन हार्वेस्टार साठी मिळतंय तब्बल 11 लाखांचे अनुदान!| असा करा ऑनलाईन अर्ज…
आवश्यक कागदपत्रेः-
आधारकार्ड (मोबाईल लिंक असलेले), मोबाईल क्रमांक, बँक तपशिल पासबुक झेरॉक्स, शिधापत्रिका, अतिरिक्त कागदपत्र एमएसएमई विभागाने विहित केल्यानुसार कागदपत्रे, कुटुंबातील सदस्याचे कागदपत्रे
मिळणारे लाभः-
पाच दिवसांचे मोफत प्रशिक्षण, प्रशिक्षणा दरम्यान ५०० रुपये प्रति दिवसाप्रमाणे विद्यावेतन, प्रशिक्षण पूर्ण करणाऱ्या कारागिरास १५ हजार रुपये किमतीची टुल किट, विनातारण रक्कम १ लाख रुपये पर्यंत ५ टक्के व्याजदराने कर्ज, बँकेकडून कर्ज मिळाल्यानंतर १८ महिन्यात परतफेड करावी लागेल, दुसरा टप्पा रक्कम २ लाख रुपये कर्ज.
समाविष्ट उद्योग
सुतार, लोहार, चर्मकार, सोनार, गवंडीकाम, मुर्तीकार, धोबी/परीट, शिंपी, कुंभार, हार-तुरे बनविणारे, नाभिक/सलुन, विणकर, झाडू-चटई तयार करणारे, दोऱ्या वळणारे, होड्या बांधणारे, मासेमारीचे जाळे तयार करणारे, कुलुप तयार करणारे, पारंपारिक खेळणी बनविणारे
अटी व शर्तीः-
या योजने अंतर्गत एका कुटुंबातील एका सदस्याला हा लाभ मिळेल. कुटुंब म्हणजे पती किंवा पत्नी आणि अविवाहित मुले, लाभार्थ्यांचे वय 18 किंवा त्याहुन अधिक असावे, तो किंवा ती लाभार्थी वरील अठरा पैकी एका व्यवसायात गुंतलेले असावेत किंवा नोंदणीच्या वेळेस मागील ५ वर्षात स्वंयरोजगार, व्यवसाय विकासासाठी क्रेडीट आधारीत योजनेचे, केंद्र किंवा राज्य सरकारची पीएमईजीपी योजना प्रधानमंत्री योजनेचे कुठलेही कर्ज घेतलेले नसावे. मुद्रा योजना किंवा पीएम स्वनिधी योजनेच्या घेतलेल्या कर्जाची परतफेड केलेली असावी तरच ते या योजनेस पात्र ठरतील, सरकारी सेवेत असलेली व्यक्ती आणि तिचे कुटुंबिय या योजनेत पात्र ठरणार नाही.