PM Kisan Yojana | शेतकऱ्यांसाठी खूशखबर : 16 वा हप्ता ‘या’ दिवशी खात्यात येणार
PM Kisan Yojana | शेतकऱ्यांना आर्थिक फायदा मिळवून देणे हा या योजनेचा उद्देश आहे. या योजनेंतर्गत सरकारने आतापर्यंत 15 हप्ते शेतकऱ्यांना दिले आहेत.
मुंबई | पीएम किसान सन्मान निधी योजना केंद्र सरकार राबवत आहे. शेतकऱ्यांना आर्थिक फायदा मिळवून देणे हा या योजनेचा उद्देश आहे. या योजनेंतर्गत सरकारने आतापर्यंत 15 हप्ते शेतकऱ्यांना दिले आहेत. आता 28 फेब्रुवारी 2024 रोजी 16 वा हप्ताही शेतकऱ्यांच्या खात्यावर येईल. या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी डीबीटीद्वारे देशभरातील लाखो शेतकऱ्यांच्या खात्यात हा हप्ता पाठवतील.
पीएम किसान योजनेंतर्गत शेतकऱ्यांना वार्षिक 6 हजार रुपये दिले जातात. ही रक्कम दर चार महिन्यांनी शेतकऱ्यांना हप्ता म्हणून दिली जाते. प्रत्येक हप्त्यामध्ये शेतकऱ्यांच्या खात्यात 2 हजार रुपये येतात. गेल्या वेळी सरकारने 27 नोव्हेंबर 2024 रोजी 15 वा हप्ता जारी केला होता. आता सरकारने 16 वा हप्ता जारी करण्याची तारीखही जाहीर केली आहे.
स्वस्त धान्य दुकान परवाना मिळण्यासाठी अर्ज करण्याचे आवाहन
सरकारने देशातील सर्व शेतकऱ्यांसाठी ही योजना सुरू केली आहे. कोणत्याही वर्गातील शेतकरी या योजनेचा लाभ सहज घेऊ शकतात. मात्र, या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना ई-केवायसी आणि जमीन पडताळणी करणे आवश्यक आहे. ज्या शेतकऱ्यांनी ई-केवायसी आणि जमीन पडताळणी केली नाही ते 16 व्या हप्त्याच्या लाभापासून वंचित राहतील. तुम्ही पीएम किसान योजनेसाठी नोंदणी केली असेल, तर तुम्ही लवकरात लवकर स्थिती तपासावी.
समजून घ्या प्रक्रिया..
– यासाठी तुम्हाला पीएम किसान योजनेच्या अधिकृत वेबसाइटवर (pmkisan.gov.in) जावे लागेल.
– यानंतर ‘नो युवर स्टेटस’ वर क्लिक करा.
– आता तुम्हाला नोंदणी क्रमांक भरावा लागेल.
– आता स्क्रीनवर दाखवलेला कॅप्चा भरा.
– यानंतर सर्व माहिती भरा आणि Get Details वर क्लिक करा.
– आता तुम्हाला स्क्रीनवर स्टेटस दिसेल.
मोठी घोषणा! राज्य सरकार देणार गाईच्या दुधाला ५ रुपये प्रति लिटर अनुदान; असा करा ऑनलाईन अर्ज…