Aurangabad-sambhajinagr city development plan| विकास आराखड्यावर आक्षेपांचा पाऊस, १९ मेपासून सुनावणी..

0
Contact News Publisher

कुणाच्या राहत्या घरावर रस्त्याचे आरक्षण, तर कुणाच्या प्लॉटवर उद्यान, शाळा होणार असल्याचे नियोजन आहे. काहींनी आपल्या वसाहतीला रस्ताच नाही, त्याची तरतूद करावी, अशी मागणी केली. शहराच्या विकास आराखड्यासाठी विविध भागांत ४०० पेक्षा जास्त आरक्षणे टाकण्यात आली आहे. मात्र, आपली मालमत्ता यात जाऊ नये, याकरिता सुमारे ८,५०० आक्षेप नोंदवण्यात आले आहेत. आपला अाक्षेप बरोबर आहे, हे पटवून देण्यासाठी सामान्य नागरिकांनी अगदी वकिलासारखा युक्तिवाद केला. यासाठी आवश्यक पुरावे आणि कागदपत्रेही त्यांनी आणली होती. पहिल्याच दिवशी ४ जणांच्या समितीने अभ्यासपूर्वक आक्षेप पाहून आश्चर्य व समाधान व्यक्त केले. बुधवारी (१५ मे) १४५ जणांच्या आक्षेपांवर सुनावणी झाली.

प्रधानमंत्री विश्वकर्मा कौशल्य सन्मान योजना; ऑनलाईन अर्ज सुरू | अर्ज करण्याचे जिल्हा प्रशासनाचे आवाहन

शहराचा विकास आराखडा ७ मार्च रोजी प्रकाशित केला. त्यावर ८,५०० आक्षेप आले. या आक्षेपांवरील सुनावणीला बुधवारपासून स्मार्ट सिटी कार्यालयात सुरुवात झाली. पहिल्या दिवशी झोन एकमधील १४५ आक्षेपकर्त्यांनी पुरावे व कागदपत्रांसह समितीसमोर युक्तिवाद केला. सुनावणी पूर्ण करून ४ महिन्यांत आराखडा अंमलात आणणार, असा दावा अधिकाऱ्यांनी केला.

EPFO ची कोट्यवधी लोकांसाठी गूड न्यूज! घर, लग्न, आजार, शिक्षणासाठी ऑटो क्लेम सोल्युशन लाँच

पुढच्या आठवड्यात १९ मेपासून आक्षेपांवर झोननिहाय सुनावणी घेतली जाणार आहे. मेअखेरपर्यंत ४ हजार आक्षेपांवर सुनावणी घेण्याचे नियोजन करण्यात आले आहे. ४ जूनपर्यंत आक्षेपांवरील सुनावणी पूर्ण करण्याचा प्रयत्न राहणार असल्याचे देशमुख यांनी सांगितले. प्रारूप विकास आराखड्यावर झोननिहाय आक्षेपांवरील सुनावणी घेण्यात येत आहे. आक्षेपधारकांचे म्हणणे ऐकून घेऊन समितीच्या सदस्यांकडून आक्षेपनिहाय निर्णय घेतला जाणार असल्याचे देशमुख यांनी सांगितले. हा अहवाल शासनाकडे पाठवण्यात येणार आहे. त्यावर अंतिम सुनावणी होऊन तो अमलात येईल. यासाठी ४ महिन्यांचा कालावधी अपेक्षित आहे.

मोठी घोषणा! राज्य सरकार देणार गाईच्या दुधाला ५ रुपये प्रति लिटर अनुदान; असा करा ऑनलाईन अर्ज…

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Trending