December 4, 2024

Crime news : फिर्यादीच निघाला आरोपी साथीदारासह केला दरोडेचा बनाव; आरोपी जेरबंद

0
Contact News Publisher

प्रतिनिधी – सचिन कुशेर

पोलीस ठाणे विरगाव या ठिकाणी भाऊ एचपी पेट्रोल पंप मॅनेजर गोरख सुनील धारबळे यांने सांगितल्यानुसार दिनांक 27 /5/ 2024 रोजी सकाळी ठीक 10 वाजून 45 मिनिटांनी Aurangabad औरंगाबाद मध्यवर्ती बँक महालगाव या ठिकाणी भाऊ पेट्रोलियम पंपावरून मोटरसायकलवर रोख रक्कम 11.34.200 बॅगेत घेऊन जात असताना वैजापूर कडून येणाऱ्या पांढऱ्या कारमधून दोन अज्ञात इस्मानी डोळ्यात मिरची पूड टाकून बॅग हिसकावून घेतली असे सांगण्यावरून गुरन नंबर 171/2024 कलम 394,34 चा गुन्हा दाखल करण्यात आला.

प्रधानमंत्री विश्वकर्मा कौशल्य सन्मान योजना; ऑनलाईन अर्ज सुरू | अर्ज करण्याचे जिल्हा प्रशासनाचे आवाहन

स्थानिक गुन्हे शाखेने तपास करित असताना फिर्यादी यांची विचारपूस केली घटनाक्रम ची चौकशी केली असता व तसेच cctv व गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळवून यामध्ये विसंगती आढळून आल्याने आज रोजी फिर्यादी यास विश्वासात घेऊन विचारपूस केली आसता सदरचा गुन्हा आरोपी 1) गोरख सुनील धारबळे वय 24 रा कनक सागज ता वैजापूर 2) दीपक आण्णासाहेब धारबळे वय 19 रा कनक सागर तालुका वैजापूर सदर 3) प्रशांत बाळू धारबळे वय 20 रा कनक सागज ता वैजापूर जि छत्रपती संभाजी नगर यांच्या साथीने गुन्हा केल्याची कबुली दिल्यानी त्यांना मुद्देमाल बाबत विचारले आसता आम्ही मयूर भंगार पत्र्याचे सेड च्या बाजूला खड्यात ठेवले आहे असे सांगितल्यावरून सदर ठिकाणचे पाहणी केली असता त्या ठिकाणी खाकी बॅगमध्ये एकूण 10,05,600 असा मुद्देमाल मिळून आला सदर तिन आरोपींना ताब्यात घेऊन त्यांना अटक करण्यात आली पुढील तपास विरगाव पोलीस स्टेशन करत आहे.

आरोग्य विभागामध्ये मेगा भरती | ऑनलाईन अर्ज करा | Arogya Vibhag Bharti 2024

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Trending