ZP govt jobs 2024 कंत्राटी पदभरती: हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना अंतर्गत कंत्राटी पदभरती

0
Contact News Publisher

वशिलेबाजी, पैशांची मागणी केल्यास तक्रार करा- जि.प. सीईओ विकास मीना

– जिल्हा शल्य चिकित्सक, जिल्हा रुग्णालय चिकलठाणा छत्रपती संभाजीनगर स्तरावर ‘हिंदु हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना’ अंतर्गत विविध पदांसाठी कंत्राटी पदभरती होत असून त्यासाठी दि.२८ पर्यंत पात्रतेनुसार अर्ज मागविण्यात आले आहे. दरम्यान या पदभरती प्रक्रियेदरम्यान कोणीही पैशांची मागणी वा वशिलेबाजीचा प्रयत्न केल्यास तात्काळ नजिकच्या पोलीस स्टेशनला आणि जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना अवगत करावे असे आवाहन जिल्हा एकात्मिक आरोग्य सोसायटी तथा मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद विकास मीना यांनी केले आहे.

हिंदुहृदय सम्ग्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना अंतर्गत विविध पदांसाठी कंत्राटी तत्वावर पदभरती होणार आहे. दि.२९ जून पर्यंत या सेवा उपलब्ध करावयाची आहे. सामाजिक आरक्षणानुसार या सेवेची जाहिरात

 

            येथे क्लिक करून अर्ज करा

 

 

 

 

        येथे क्लिक करून जाहिरात पहा

http://www.zpaurangabad.gov.inhttps://arogya.maharashtra.gov.in

या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आली आहे. शैक्षणिक अर्हता, अनुभव इतर अटी व शर्ती याबाबतची सविस्तर माहिती या जाहिरातीत देण्यात आली आहे. इच्छुक उमेदवारांनी ही जाहिरात, अर्जाचा नमुना प्राप्त करुन घ्यावा. विहित शुल्कासहित संपूर्ण भरलेले अर्ज दि.२८ जून पर्यंत सर्व कागदपत्रे व परीक्षा शुल्कासह कार्यालयीन वेळेत सादर करावे.

Aurangabad-sambhajinagr city development plan| विकास आराखड्यावर आक्षेपांचा पाऊस, १९ मेपासून सुनावणी..

ही निवड प्रक्रिया अत्यंत पारदर्शकपणे पार पाडण्यात येत असून या भरती प्रक्रियेदरम्यान अनधिकृत व्यक्तिंकडून आपली ओळख असल्याचे भासवून पैसे घेऊन आपण कंत्राटी सेवा लावून देऊ असे सांगून उमेदवारांची फसवणूक होऊ शकते. याप्रक्रियेदरम्यान असे कोणी पैशांची मागणी केल्यास वा वशिलेबाजीचा प्रयत्न केल्यास त्याबाबत तात्काळ नजिकच्या पोलीस स्टेशनला व जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना अवगत करावे,असे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विकास मीना यांनी केले आहे.

EPFO ची कोट्यवधी लोकांसाठी गूड न्यूज! घर, लग्न, आजार, शिक्षणासाठी ऑटो क्लेम सोल्युशन लाँच

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Trending